आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीची गोळ्या घालून हत्या, पती म्हणाला- तिने आत्महत्या केली, पण निघाले भलतेच...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटनी/जबलपूर (मध्य प्रदेश)- पोटचीमुलगी आणि मुलावर गोळीबार करुन एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सखोल तपास करण्यात आला. या घटनेत महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला होता तर मुलगा जबर जखमी झाला होता. अखेर सत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांना धक्काच बसला.
पत्नीच्या डोक्यात होत्या दोन गोळ्या
- पतीचे नाव अरशद कुरेशी तर पत्नीचे शमा परवीन आहे. त्यांना जिया (12) नावाची मुलगी आणि अर्श (दीड) नावाचा मुलगा होता.
- अरशद प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करतो. त्या सध्या प्रचंड आर्थिक संकटात आहे.
- शमा परवीन त्याची दुसरी पत्नी होती. तिच्याशी त्याने प्रेमविवाह केला होता.
- तिच्या पहिल्या पतीपासून तिला भरपूर प्रॉपर्टी मिळाली होती. तिच्या नावावर ती प्रॉपर्टी होती.
- अरशदला ही प्रॉपर्टी विकून कर्ज चुकते करायचे होते. पण त्याला शमाचा विरोध होता.
- यावरुन अरशद आणि शमा यांच्यात कायम खटके उडायचे.
अशा केल्या हत्या
- अरशदकडे बंदूक होती. त्याने शमा आणि दोन्ही मुलांवर गोळीबार केला. शमाला डोक्यात दोन गोळ्या मारल्या.
- गोळीबारात शमा आणि जियाचा जागीच मृत्यू झाला तर अर्श जबर जखमी झाला होता.
- त्यानंतर अरशदने स्वतःवरही हातात गोळी झाडली. शमाने आत्महत्या केली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात मला गोळी लागली असे पोलिसांना सांगितले.
- बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली होती. तेव्हाच हा प्रकार घडला असे अरशदने सांगितले होते.
- पण पोलिसांनी तपास केला तेव्हा आढळून आले, की मंगळवारी रात्री 12 ते सकाळी 4 च्या दरम्यान गोळीबार झाला होता. तेव्हा अरशद घरीच होता.
- तसेच शमाच्या डोक्यात गेलेल्या गोळ्यांची दिशा अरशदने सांगितलेल्या दिशांशी मॅच होत नव्हती.
- त्यानंतर पोलिसांनी अरशदला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. तेव्हा सत्य समोर आले.
- मीच गोळीबार केला, असे त्याने कबुल केले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...