आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनिमूनचा आहे हा फोटो, मग 3 महिन्यांनी बेडरूममधून निघून किंचाळू लागला पती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - भोपाळच्या जहांगिराबाद परिसरात एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथे एका पतीने लग्नाच्या तीन महिन्यानंतर आपल्या पत्नीची हत्या केली. आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपी पती बनवेगिरी करत राहिला, परंतु शेवटी सत्य समोर आलेच. 
 
असे आहे प्रकरण
- अहाता कल्ला शहा परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय अमरीन खानचे जहांगिराबादच्या इम्रान खानशी तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही हनिमूनला गेले होते.
- मागच्या एक महिन्यापासून इम्रान सासरवाडीत राहू लागला होता. लग्नानंतर इम्रानने अमरीनला त्रास द्यायला सुरुवात केली होती. तो नेहमी तिला मारझोड करत होता.
 
बेडरूममधून निघून किंचाळू लागला पती...
- मंगळवारी इम्रानचे नातेवाईक ईदनिमित्त घरी आले होते. सर्वांनी जेवण केले. रात्री सर्व गेल्यानंतर झोपायला गेले. 
- पहाटेच्या नमाजाच्या वेळी इम्रान बेडरूममधून बाहेर आला आणि आरडाओरड करू लागला. सर्वांना त्याने अमरीनला काहीतरी झाल्याचे सांगितले.
त्याच्या गळ्यावर नखांनी ओरबाडल्याच्या खुणा होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसही तेथे पोहोचले.
 
पोलिसांनी केली अटक...
- पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे आढळले. यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले. अमरीनच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले की, इम्रानला त्यांनी नवी अॅक्टिव्हा घेऊन दिली होती. रमजानमध्ये त्याला 25 हजार रुपये दिले होते. अमरीनला तो नेहमी मारझोड करायचा म्हणूनच त्याला आमच्याकडे ठेवले होते. सीएसपी भारतेंदु शर्मा यांनी सांगितले की, खुनाचा गुन्हा दाखल करून पती इम्रानला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...