Home »National »Madhya Pradesh» Husband Molested His Wife In Court Premises

मुलीला बळजबरी अंघोळीला न्यायचा बाप, मनाई केल्यावर करायचा असे काम

दिव्य मराठी वेब टीम | Aug 14, 2017, 13:50 PM IST

  • जीवन मोटर्सचा मालक पवनदीपच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.
भोपाळ -घरगुती हिंसेच्या प्रकरणातील सुनावणीसाठी कौटुंबिक न्यायालयात पोहोचलेल्या महिलेला तिच्या नवऱ्याने कोर्ट परिसरातच जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही, तर चिडलेल्या नवऱ्याने महिलेला मारहाणही केली. या हायप्रोफाइल प्रकरणाची एमपी नगर पोलिसांत नोंद करण्यात आली. दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्यांनीही पोलिसांना या हायप्रोफाइल प्रकरणातील आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- जीवन मोटर्सचा मालक पवनदीप छतवाल याची पत्नी जसलीनने तक्रारी सांगितले की, पवनदीप नेहमी मारहाण करायचा. मी सहन करत राहिले, पण जेव्हा त्याने मुलांशी क्रूरता केली तेव्हा मी लांब राहण्याचा निर्णय घेतला. तिने पोलिसांत कौटुंबिक हिंसेची तक्रार दिली व उदरनिर्वाहासाठी केसही दाखल केली. सुनावणीसाठी दिल्लीला गेली होती. दरम्यान, कोर्ट परिसरात पवनदीप दिसताच ती म्हणाली की, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मुलांच्या फीससाठी पैसे द्या. यावर त्याने अभद्र वर्तन करून मारहाण सुरू केली. हातही पिरगाळला. माझ्या वडिलांना धक्का देऊन खाली पाडले. आणि धमकी दिली की केस मागे घे नसता तुझा जीव घेईन. पोलिसांनी यावर गुन्हा दाखल केला आहे. यावर पवनदीपने काहीही बोलण्यास नकार दिला.
12 वर्षांच्या मुलीला सारखी-सारखी अंघोळ घालायचा नवरा
- जसलीन यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचे 2002 मध्ये लग्न झाले होते. त्यांना 12 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांचा मुलगा आहे.
- त्या म्हणाल्या की, नवऱ्याचा खूप आक्रमक स्वभाव आहे. तो नेहमी मारहाण करायचा. मुले जितक्या वेळा नैसर्गिक विधी करायचे तितक्या वेळा नवरा त्यांना अंघोळासाठी सांगायचा.
- अनेकदा मुले अंघोळीला नकार द्यायची, तर हा त्यांना स्वयंपाकघरात अंघोळ घालायचा.
- माझी मुलगी आता 12 वर्षांची झाली आहे, ती आता वडिलांनी अंघोळ घातलेले आवडत नाही. ती त्याचा विरोध करायची. मग नाराज होऊन तो तिलाही मारहाण करायचा.
- नवरा नेहमी आम्हा तिघा माय-लेकरांना मारायचा. म्हणूनच मी 2016 पासून त्याला सोडले आणि दिल्लीत वडिलांच्या घरी शिफ्ट झाले.
यासाठी कोर्टात गेली होती महिला
- वेगळे झाल्यानंतर मी कौटुंबिक न्यायालयात तक्रार दाखल करून मुलांच्या पालनपोषणासाठी खर्चाची मागणी केली.
- शुक्रवारी त्याचीच सुनावणी होती. तिथेच कोर्ट परिसरात त्याने मला मारहाण केली.
- कोर्टाने जी काही रक्कम ठरवली आहे, ती मला मिळावी एवढीच माझी मागणी असल्याचे जसलीन म्हणाल्या.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी PHOTOS...

Next Article

Recommended