आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या MURDER ला भासवले सुसाइड, अटक झाल्यावर विष घेऊन केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्य प्रदेश)- पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी पत्नीने पतीला जोरदार धक्का मारला. त्याच्या डोक्याला घरातील दगड लागला. डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. त्याचा लगेच मृत्यू झाला. पण पत्नी या प्रकाराने घाबरली. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दाखवले. पण अखेर पोलिस तपासात बिंग फुटले. तिला अटक झाली. पण तिने पोलिस ठाण्यात विष घेऊन आत्महत्या केली. आता तिला विष कुणी आणून दिले याचा पोलिस तपास करीत आहेत.
अशी घटली घडना
पतीचे नाव विकास अहिरवार आणि पत्नीचे सरस्वती आहे. 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले. दोघे हजरत निझामुद्दिन कॉलनीतील सिद्धार्थ एन्क्लेव्हमध्ये राहत होते. त्यांना चार वर्षांची अंशू नावाची मुलगी आणि दोन वर्षांचा आयुष नावाचा मुलगा आहे. विकासचे वडील सरकारी नोकरीत आहेत. चांदबड येथे ते राहतात. विकास स्नॅपडीलमध्ये कामाला होता.
विकासचा मृतदेह घरातील पंख्याला गळफास घेतलेला आढळून आला होता. पण त्याच्या शरीरावर 13 जखमा होत्या. त्यातील काही डोक्याचा मागच्या भागात होत्या. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यातून जखमांमुळे विकासचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने सगळे खरे खरे सांगितले. पोलिसांना या खूनामागचे खरे कारण समजले. पोलिसांनी सरस्वतीला अटक केली. पण तिने पोलिस ठाण्याच्या लॉकरमध्ये आत्महत्या केली.
पुढील स्लाईडवर बघा, दोघांच्या घराचा फोटो....
बातम्या आणखी आहेत...