आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Wanted Second Marriage, Wife Reach Marriage Ceremony

पती करणार होता दुसरे लग्न, कोर्टाची ऑर्डर घेऊन मंडपात पोहोचली पत्नी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुना (मध्य प्रदेश)- पत्नी असतानाही दुसरे लग्न करण्यासाठी मांडवात पोहोचलेला नवरोबा यज्ञ शर्मा याला पोलिसांनी अटक केली. पत्नी वंदना वर्मा कोर्टाची ऑर्डर घेऊन लग्नमंडपात दाखल झाल्याने त्याचे बिंग फुटले. त्यानंतर पोलिसांनी हा विवाह रोखला.
वंदना वर्मा दिल्लीच्या रहिवासी आहेत. या लग्नाची माहिती मिळाल्यावर वंदना भावासह कोर्टाची ऑर्डर घेऊन प्रथम पोलिस आयुक्तांना भेटल्या. त्यानंतर पोलिस टीम घेऊन मांडवात दाखल झाल्या. त्यांना बघितल्याबरोबर यज्ञचा चेहराच उतरला. लग्नाचे वातावरण बदलले. पोलिसांनी यज्ञला अटक केली. पोलिस स्टेशनमध्ये त्याला घेऊन गेले.
आईवडीलांना भेटण्यासाठी आला होता यज्ञ
वंदनाने दावा केला आहे, की आईवडीलांना भेटायचे आहे असे सांगून यज्ञ दिल्लीहून भोपाळला आला होता. या दरम्यान गुना येथील पाराशर कुटुंबातील एका तरुणीशी त्याचे लग्न पक्के करण्यात आले. दोघांचे लग्न होणारच होते. पण तेवढ्याच वंदना मांडवात दाखल झाल्या. पोलिसही आले. त्यांनी दिल्ली न्यायालयाचा स्टे ऑर्डर आणला होता.
तिसरे लग्न करणार होता यज्ञ
वंदनाने सांगितले, की भोपाळमधील रिलायबल हायटेक सिटीमध्ये यज्ञ राहतो. त्याने 2012 मध्ये गायत्री मंदिरात माझ्यासोबत लग्न केले आहे. माझ्याकडे लग्नाचा पुरावा आहे. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने ककवासा येथील एका तरुणीसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तरुणीला याबाबत सांगितले होते. त्यानंतर हे लग्न तुटले.
पुढील स्लाईडवर बघा, वंदना दाखल झाल्यावर असे बदलले लग्नाचे वातावरण... यज्ञाला झाली अटक...