आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IAS Couple Arvind Joshi Tinu Joshi News In Marathi

सनदी अधिकारी दांपत्याला बडतर्फ करण्याची शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - भ्रष्टाचार प्रकरणात मध्य प्रदेशातील अरविंद आणि टीनू जोशी या सनदी अधिकारी दांपत्याला बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची बडतर्फी होऊ शकते.

मध्य प्रदेश सरकारने केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तिवेतन मंत्रालयाकडे ही शिफारस पाठवली. त्यात जोशी दांपत्याला सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. दरम्यान, 2010 मध्ये आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत या दांपत्याच्या घरातून रोख 3 कोटी रुपये मिळाले होते. त्यात जोशी दांपत्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते.