आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आधार कार्ड न मिळाल्यास ई-मेल करा किंवा पाठवा पत्र'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - आधार कार्डसाठी नोंदणी करूनही ज्यांना आधार कार्ड मिळालेले नाही, असे नागरिक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या पत्त्यावर पत्र पाठवून किंवा ई-मेल करून आपल्या आधार ओळखपत्राबाबत माहिती विचारू शकतात. प्राधिकरणाच्या उपसंचालक सुजाता चतुर्वेदी यांनी ही माहिती दिली.


ज्या नागरिकांना आधार ओळखपत्रासाठी नोंदणी करूनही ओळखपत्र मिळालेले नाही त्या नागरिकांनी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आपले नाव, नोंदणीच्या वेळी दिलेला मोबाइल क्रमांक, पत्ता, पिनकोड, जन्मतारीख या माहितीसोबत आधार नोंदणीनंतर मिळालेल्या पावतीवर असलेला ईआयडी क्रमांक मेल केल्यास, त्यांच्या आधार ओळखपत्राबाबत माहिती मिळू शकते, असे चतुर्वेदी यांनी सांगितले.


प्रत्यक्षात ओळखपत्र मिळाले नसेल, पण संकेतस्थळावर ओळखपत्र तयार असेल, तर ते डाऊनलोड करून काढलेली प्रिंटआऊटही सर्वत्र आधार ओळखपत्र म्हणून मान्य केली जाईल, असा खुलासाही चतुर्वेदी यांनी केला.
अशी मिळेल माहिती आधार प्राधिकरणाच्या वेबसाइटवर ई-मेल केल्यानंतर तुमच्या मोबाइलवर एसएमएस येईल. तुमचे आधार कार्ड तयार झालेले आहे किंवा नाही, याची माहिती त्यात दिलेली असेल.


येथे करा ई मेल :
यूआयडीएआय आरओडीईएलएचआय @ जीमेल.कॉम
येथे पत्र लिहा :
०भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण, क्षेत्रीय कार्यालय, दिल्ली कक्ष 27-28, हॉटेल जनपथ, जनपथ, नवी दिल्ली, 110001
० या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा 011 - 23747095, 237477097