इंदूर (मध्य प्रदेश)- रॅम्पवर पाऊल ठेवणारे फॅशन इंडस्ट्रीजचे प्रसिद्ध चेहरे नाहीत. तरीही यांचा उत्साह बघितल्यावर अनुभवी मॉडेल्सही फिके पडतील. आयआयटी इंदूरमध्ये झालेल्या अॅन्युअल मीटमध्ये विद्यार्थ्यांनी खूप जल्लोष केला. यावेळी फॅशन शोही आयोजित करण्यात आला होता. त्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
आयआयटी इंदूरची अॅन्युअल मीट 'फ्लक्स'मध्ये विद्यार्थ्यांच्या अदांसोबत फॅशनचा संगम बघायला मिळाला. यावेळी झालेल्या फॅशन शोमध्ये तरुण-तरुणी सहभागी झाले होते. त्यांना बघितल्यावर ते प्रोफेशन मॉडल्स असावे असे वाटत होते. त्यांनी पाश्मिमात्य फॅशनचे कपडे सादर केले. यावेळी रॅम्पवर चालतानाचा त्यांचा विश्वास बघण्यासारखा होता. तीन दिवसांच्या या समारंभात गायिका अदितीसिंह हिने एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. यासह इतरही कार्यक्रम घेण्यात आले.
अॅन्युअल मीटमधील विद्यार्थ्यांचा उत्साह बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...