आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIT Topper Indicated In Dowry Case Has Been Released By Court

IIT टॉपर फसला हुंड्याच्या बनावट प्रकरणात, जेलमध्ये मारहाण झाल्यावर स्वतः लढवली केस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- आयआयटी कानपूरमध्ये टॉपर राहिलेल्या आणि टोकियोच्या प्रसिद्ध कंपनीत जॉब केलेल्या तरुणाची स्टोरी एखाद्या चित्रपटाला लाजवणारी आहे. या तरुणावर पत्नीने हुंड्याची बनावट तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचे आयुष्यच पालटून गेले. नोकरी गेली. कारागृहात राहावे लागले. पोलिसांनी मार मार मारले. पण त्याने पराभव स्वीकारला नाही. त्याने स्वतः बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. कायद्याची पुस्तके वाचली. सुप्रीम आणि हाय कोर्टातील अशा केसेसचा अभ्यास केला. प्रभाविपणे बाजू मांडली. तब्बल दोन वर्ष चार महिन्यांनी न्यायालयाने या युवकाला आणि त्याच्या आईवडीलांना दोषमुक्त केले आहे.
इंदूरच्या शांती निकेतन कॉलनीत राहत असलेल्या असिस्टंट प्रोफेसर प्रज्ञा द्विवेदी या महिलेने पती दिप्तांशू शुक्ला, सासू गायत्री आणि सासरे रमेशचंद्र शुक्ला यांच्यावर हुंडा मागितल्याचा, छळ केल्याचा आरोप करीत पोलिस तक्रार दिली होती. हुंडा म्हणून सासरी 15 लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर एक कोटी रुपये आणि घराची मागणी करीत छळ करण्यात आला, असेही तिने सांगितले. त्यानंतर ही केस प्रथमश्रेणी मॅजिस्टेटकडे गेली. त्यांनी न्यायालयाकडे पाठवली.
दोषमुक्त होण्याचे आधार
प्रज्ञा आणि तिच्या आईवडीलांच्या वक्तव्यांमध्ये खुप विरोधाभास होते. त्यांनी 15 लाख रुपये देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीचे नाव वेगवेगळे सांगितले. प्रज्ञा आणि दिप्तांशू विदेशात हनिमुनला गेले होते. त्यानंतरही अनेकदा ते विदेशात गेले. दोघांचे फोटो न्यायालयात सादर करण्यात आले. शेजाऱ्यांची जबानी घेण्यात आली. त्यातून प्रज्ञा खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले.
पत्नीचे केले स्टिंग ऑपरेशन
याबाबत दिप्तांशू सांगतो, की मी स्वतः केस लढविण्याचा निर्णय घेतला होता. नोकरी गेली होती. त्यानंतर संपूर्ण वेळ कायद्याची पुस्तके वाचणे आणि इंटरनेटवर सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टच्या निर्णयांची माहिती करुन अभ्यास केला. पत्नीने फॅमिली कोर्टात मेंटेनेन्सची केस लावली होती. तेथे ती नियमित जात होती. पण जिल्हा न्यायालयात आजारी असल्याचा अर्ज टाकला होता. मी पत्नीचे स्टिंग ऑपरेशन करुन कोर्टाला सांगितले, की पोलिस कसे पत्नीला मदत करीत आहे. त्यानंतर लवकर सुनावणी करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर मी प्रत्येक पेशीत माझी बाजू प्रभावीपणे मांडली. पत्नीचे असत्य अघड केले. कोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला आहे. यावर मी समाधानी आहे. अखेर आमच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे निघाले.
पुढील स्लाईडवर बघा, प्रज्ञा आणि दिप्तांशूच्या लग्नाचे फोटो...