आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1 हजार रुपयांमध्‍ये विकले जातात देशी कट्टे, बंदूका, कित्‍येक राज्‍यात होतो पुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोरेना / ग्वाल्हेर - शस्त्र परवाना मिळवण्‍याची प्रक्रिया पोलिस आणि प्रशासनाने जटील केल्‍यानंतर शस्‍त्रांच्‍या अवैध विक्रीला उधाण आले आहे. मध्‍यप्रदेशातील मोरेना जिल्‍ह्यात अवैध शस्‍त्रांच्‍या वाढत्‍या वापरामुळे येथे हत्‍या आणि चोरीच्‍या घटनांमध्‍ये सुमारे 10 टक्‍के वाढ झाली आहे. अवैध शस्‍त्रांचा अड्डा बनले चंबळ...
-लोकसभा, विधानसभा निवडणूकांमध्‍ये मोरेना जिल्‍हा परिसरातील गावांमध्‍ये देशी कट्ट्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते.
-निवडणूकीच्‍या काळात शस्‍त्र ताब्‍यात घेतल्‍यानंतरही मतदान केंद्रांवरील भांडणात गोळीबार झाल्‍याच्‍या घटना समोर आल्‍या आहेत.
- अपूर्ण मनुष्‍यबळ असल्‍यामुळे पोलिस अवैध शस्‍त्रांच्‍या विक्रीला पायबंद घालू शकत नाहीत.
- अवैध शस्‍त्रांच्‍या तस्‍करीचा भांडाफोड करण्‍यासाठी पोलिसांना जिल्‍ह्याच्‍या बाहेर पडावे लागते.
- मात्र पोलिसांकडे अतिरिक्‍त मनूष्‍यबळ नसल्‍याने ही बाब शक्‍य होत नाही.
पाच वर्षांमध्‍ये वाढला अवैध शस्‍त्रांचा व्‍यापार..
- अवैध शस्‍त्रांच्‍या व्‍यापारात भिंड जिल्‍हा सर्वाधिक पुढे आहे. मात्र मोरेनामध्‍येही देशी कट्ट्यांचा वाढता वापर लोकांमध्‍ये दहशत पसरवणारा आहे.
- मागील पाच वर्षांमध्‍ये पोलिसांनी पकडलेल्‍या अवैध शस्‍त्रांच्‍या संख्‍येमध्ये दुपटीने वाढ झाली अाहे.
- 2011 मध्‍ये पोलिसांनी 204 अवैध बंदूका, कट्टे व पिस्तूल ताब्‍यात घेतले होते.
- 2015 च्‍या कारवाईत ही संख्‍या वाढून 389 पर्यंत पोहोचली आहे.
-अवैध शस्त्र कोठून आले, कोणी तयार केले, कोणी खरेदी केले याबाबत पोलिसांनी कारवाई करायला हवी होती.
- मात्र मोरेना, भिंड व दतिया जिल्‍ह्यातील पोलिस अधिका-यांनी याबाबत विशेष कामे करून घेतली नाहीत.

मुंगेर, बु-हाणपूर येथून येतात शस्‍त्र..
-अवैध शस्‍त्रांचा पुरवठा बिहारमधील मुंगेर, यूपीमधील इटावा व मध्यप्रदेशातील खंडवा, बु-हाणपूर, धार व खरगोन जिल्‍ह्यातून होतो.
-एक हजार रूपयात 12 बोरचा कट्टा आणि 1500 रुपयात 315 बोरचा कट्‌टा मिळतो.
- तीन ते पाच हजार रुपयांमध्‍ये देशी पिस्‍तूल आणि रिवाल्वर उपलब्‍ध होते.
असे घडले गुन्‍हे..
-हत्या:
वर्ष 2013 मध्‍ये 60
- वर्ष 2014 मध्‍ये 59
- वर्ष 2015 मध्‍ये 65
हत्येचा प्रयत्‍न
- वर्ष 2013 मध्‍ये 116
- वर्ष 2014 मध्‍ये 139
- वर्ष 2015 मध्‍ये 99
काय म्‍हणाले निवृत्‍त डीएसपी ..
सेवानिवृत डीएसपी के.डी. सोनकिया म्‍हणाले, अवैध शस्त्र पकडल्‍यानंतर पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टरने आरोपीकडून घेतलेल्‍या माहितीच्‍या आधारे शस्‍त्र तयार होतात त्‍या ठिकाणापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्‍यामुळे या व्‍यवसायाशी जुळलेल्‍या सर्व लोकांना पकडता येऊ शकते. मात्र कायद्याच्‍या गुंतागुतीमुळे पोलिस त्‍या लोकांपर्यंत पोहचू शकत नाहीत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, कसे तयार केले जातात देशी शस्‍त्रे..
बातम्या आणखी आहेत...