आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Swimming Pool And Other Construction Found In Ashram Of Asaram Bapu

PHOTOS: आसाराम बापूंच्‍या आश्रमात आलिशान स्विमिंग पूलसह आलिशान सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- आसाराम बापू तुरुंगात गेल्‍यानंतर रोज नवी माहिती उघड होत आहे. आता त्‍यांच्‍या बेकायदेशीर बांधकामांचा भंडाफोड झाला आहे. इंदूर येथील आश्रमातील पक्‍के बांधकाम आणि शाळेचे बांधकाम बेकायदेशीर असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. तर, अहमदाबाद येथील आश्रमातून काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी गोळा केल्‍याची माहिती आहे. त्‍यामुळे आसाराम यांच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत.

इंदूरच्‍या प्रशासनाने आश्रमाची तपासणी केली. कागदपत्रांची पडताळणी केल्‍यानंतर मोठ्याप्रमाणवर करण्‍यात आलेले बांधकाम अवैध असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. या आश्रमात आसाराम बापूंसाठी आलिशान निवासस्‍थान बांधण्‍यात आले होते. त्‍यात जलतरण तलावासह अनेक सुविधा असल्‍याचे उघड झाले. हे सर्व बांधकाम अवैध आहे.