आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांपूर्वीचा तोंडी ‘तीन तलाक’ ठरवला अवैध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 उज्जैन- उज्जैन कौटुंबिक न्यायालयाने मुस्लिम दांपत्यातील ‘तीन तलाक’ अवैध, प्रभावशून्य म्हणत रद्द केले आहे. तौसिफ शेख आणि आर्शी या दांपत्याचे लग्न सव्वाचार वर्षांपूर्वी झाले होते. दोन वर्षांनंतर तौसिफने काही लोकांच्या उपस्थितीत आर्शीला तीनदा ‘तलाक’ म्हणत सोडून दिले. 
 
याविरोधात अतिरिक्त मुख्य न्यायमूर्ती ओमप्रकाश शर्मा यांच्या न्यायालयात आर्शीने पती तौसिफ शेख, सासरे सलीम शेख आणि शहराचे काझी खलीकुर्रेहमान यांच्याविरोधात खटला दाखल केला. न्यायालयाने मार्च २०१७ मध्ये निर्णय दिला. आर्शीकडून वकील अरविंद गौड आणि हाफिज कुरेशी यांनी बाजू मांडली. मुस्लिम धर्मग्रंथांतील नियम आणि अटींचा दाखला त्यांनी युक्तिवादात दिला. त्यावर कोर्टानेही सहमती दाखवत घटस्फोट रद्द केला.

फक्त ‘तलाक’ म्हणणे पुरेसे अाहे : काझी
-शुद्धीत असो किंवा नशेत फक्त ‘तलाक’ म्हटले तरी घटस्फोट होऊ शकतो. आर्शी आणि तौसिफप्रकरणी न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळालेली नाही. त्यानंतरच याप्रकरणी काही सांगता येईल.
- खलीकुर्रेहमान, शहर काझी
बातम्या आणखी आहेत...