आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ - देशात सुमारे 45 कोटी मुले 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. शरीरसंबंधांची वयोर्मयादा घटवण्यापेक्षा या मुलांना योग्य रीतीने जगण्याचा अधिकार देणे महत्त्वाचे असल्याचे देशभरातील खासदारांचे म्हणणे आहे. तथापि, याकडे सरकारची मात्र डोळेझाक आहे.
लैंगिक शिक्षण नाही
72 % जणांना लैंगिक शिक्षण नाही यातून एड्स, टीन एज प्रेग्नन्सी, अँबॉर्शन अशा घटना वाढतील.
मजुरी करत आहेत
50 लाखांवर मुले मजुरी करत आहेत. यातही 20 लाख मुले धोकादायक कामांमध्ये आहेत. ही बालमजुरी कमी करावी.
शिकू शकत नाहीत
2.4 कोटी मुलांची नावे शाळेत दाखल नाहीत. नावे दाखल आहेत त्यापैकी 64 टक्के मुले कधीतरीच शाळेत जातात.
जेवणही मिळत नाही
1.1 कोटी मुलींचे वजन सरासरीपेक्षा कमी. गरिबीमुळे पोषक आहार न मिळाल्याने सव्वा कोटी मुली व 60 लाख मुलांमध्ये रक्ताची कमतरता.
घर सोडून जाणे
40 लाखांवर मुले दरवर्षी पोट भरण्यासाठी घर सोडतात. 10 ते 15 लाख मुले इतर कारणांसाठी घर सोडून जातात, बेपत्ता होतात.
निर्णय प्रक्रियेत भाग घेतला जात नाही
60 % मुली आणि 3.5 % मुलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही. त्यांना स्वत:चे निर्णय घेण्यासाठी कसे सोडता येईल?
कमी वयात लग्न
एक कोटीहून जास्त जणांचे कमी वयात लग्न होते. 10 लाखांहून अधिक मुली दरवर्षी आई होतात.
गुन्हेगारीकडे वळतात
या वयातील 21,657 मुले 2011 मध्ये कोणत्या ना कोणत्या गुन्हय़ात आहेत. गरिबी हे मोठे कारण.
व्यसनांच्या आहारी
प्रत्येक पाचपैकी एक मुलगा व्यसनाधीन आहे. 13 ते 15 वयाची कैक मुले रोज सिगारेट ओढतात. 15% मुले दारूही पितात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.