आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inactive Bomb Found In Train At Manikpur Railway Station.

महानगरी एक्सप्रेसमध्ये सापडला गावठी बॉम्ब; रेल्वेमंत्र्यांना मागितली 10 कोटींची खंडणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेमंत्र्यांना खंडणीचे पत्र - Divya Marathi
रेल्वेमंत्र्यांना खंडणीचे पत्र
सतना- सतनापासून शंभर किलोमिटर अंतरावर असलेल्या माणिकपूर (उत्तर प्रदेश) रेल्वे स्थानकावर महानगरी एक्स्प्रेसमध्ये गावठी बॉम्ब सापडला. बॉम्ब निकामी करण्यात जीआरपीला मिळाले यश आले आहे. बॉम्बसोबत एक पत्रही मिळाले आहे. पत्राद्वारे रेल्वेमंत्रीकडून 10 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्‍यात आली आहे. प्रवाशी अशोक यादव यांनी पोलिसांना ही एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचे माहिती दिली होती. ही एक्स्प्रेस वाराणशीहून मुंबईला जात होती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माणिकपूर स्टेशनवर एस-3 कोचच्या टॉयलेटजवळ प्रवाशी अशोक यादव यांनी एक संशयित पिशवी पाहिली. यादव याने ही माहिती पोलिसांना दिली. सूचना मिळताच माणिकपूर स्टेशनवर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ), जीआरपी बॉम्ब स्क्वॉड व डॉग स्क्वॉड पोहोचला.

बॉम्ब स्क्वॉडने संशयित पिशवीची तपासणी केली असताना गावठी बॉम्ब सापडला.रात्री एक्सप्रेसची तपासणी करून बॉम्ब स्कवॉड पथकाने बॉम्ब डिफ्यूज केला. या दरम्यान मोठा आवाजही झाला.
बॉम्ब ठेवणारा इंग्रजीचा जानकार
- बॉम्बसोबत पत्र ठेवणारा अज्ञात इंग्रजीचा उत्तम जानकार असावा.
- अज्ञात व्यक्तिने पत्रात लिहिले आहे की, रेल्वे अपघातात प्रवाशांना पुरेशी आर्थिक मदत मिळत नाही. जर रेल्वेमंत्र्यांनी 10 कोटी रुपये द्यावे. रेल्वे मंत्री रुपये देण्यास तयार असतील तर एस 4 व एस 5 कोचमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर लावावे.
- मुंबई पोलिस स्टेशनमध्ये एक पर्स मिळेल, त्यात या पुढे काय करायचे याबाबत माहिती दिलेली असेल, असे सांगण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, संबधित फोटोज...