आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत तरुणांचे महिलांसोबत गैरवर्तन, रेल्वे-पोलिस-लष्कराने हात झटकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/ग्वाल्हेर - भारतीय सैन्य दलात भरतीसाठी आलेले युवक सोमवारी मुरैना येथे चंबळ एक्स्प्रेसने परतत असताना त्यांनी मोठा गोंधळ घातला. महिलांसमोर स्वतःचे कपडे उतरवले. यावेळी रेल्वे पोलिस देखिल फक्त तमाशा पाहात उभे राहिले. घटनेच्या 24 तासांनंतरही रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस आणि लष्कराने जबाबदारी झटकली. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे, की रेल्वे प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरवशावर आहे ? रेल्वीची जबाबदारी काय फक्त एका ट्विटवर चहा, कॉफी आणि डायपर पोहोचवण्याचीच आहे का ?

काय म्हणाले लष्कर आणि रेल्वे प्रशासन
या संपूर्ण प्रकरणात तिन्ही प्रशासनांनी अंग झटकले. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी बोलण्यासही नकार देत या प्रकरणी आमचे जनसंपर्क अधिकारी उत्तर देतील असे सांगितले.

रेल्वेचे उत्तर
कालच्या घटनेत रेल्वेची कोणतीही जबाबदारी नाही. काल जे काही झाले तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. लष्कराने आम्हाला अतिरिक्त कोच आणि इतर सुविधांबद्दल सांगितले होते. आम्ही मिळालेल्या सुचनेनुसार सर्व व्यवस्था ठेवली होती. रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे पोलिसांची असते.
- गिरीश कंचन, रेल्वे जनसंपर्क अधिकारी

रेल्वे पोलिसांचे उत्तर
ही घटना आमच्या हद्दीतील नव्हती. जो प्रकार झाला तो उत्तर प्रदेशातील हरपालपूर येथे झाला. आता तुम्ही म्हणता म्हणून एकवेळ मान्य केले ही तर, आम्हाला चेव्हा माहिती मिळाली तेव्हा केंद्र सरकारचे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान स्टेशनवर पोहोचले होते. त्यांनी 8 जणांना या प्रकरणी अटक केली आहे. रेल्वे कोचमध्ये जे पोलिस होते, त्यांनी काहीही केले नाही, असे म्हणणे चुकीचे होईल.
- अवधेश गोस्वामी, पोलिस अधीक्षक रेल्वे पोलिस

लष्कराचे उत्तर
लष्कराच्या भरतीवेळी अशा घटना घडण्याचा पूर्वइतिहास आहे. त्यामुळे आम्ही रेल्वे प्रशासनाला आधीच याची माहिती दिली होती. 8 जानेवारी रोजी त्यांना पत्र पाठवून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या. रेल्वेकडे पुरेसा वेळ होता. त्यांनी योग्य उपाययोजना करणे आपेक्षीत होते.
कर्नल आर. रमेश

सैन्य भरतीवेळी कुठे-कुठे झाला गोंधळ
16 जानेवारी 2015- सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या युवकांनी प्रवाशांच्या आरक्षित जागा बळकावल्या. रेल्वेवर दगडफेक करुन रेल्वेच्या खिडक्या फोडल्या.
17 जानेवारी 2015- सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या युवकांनी खजुराहो-उदयपूर इंटरसिटीमध्ये गर्भवती महिलेला मारहाण केली.
18 जानेवारी 2015- सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या युवकांनी चंबल एक्स्प्रेसमध्ये सोमवारी रात्री सर्व सीमा ओलांडल्या आणि गोंधळ घातला. युवकांनी महिलांसमोर कपडे उतरवण्याचे लाजीरवाणे कृत्य केले.
ऑक्टोबर 2012- अलवर येथे रेल्वेस्टेशन पासून सैन्य भरतीचे ठिकाण लांब होते, तेव्हा भरतीसाठी आलेल्या युवकांनी आधी रेल्वेतील प्रवाशांना मारहाण केली. स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या कारची तोडफोड केली, हातगाडीवाल्यांसोबत हुज्जत घालून लुटालूट केली.
11 सप्टेंबर 2015- सीकर येथे वायुदलातील भरतीसाठी जाणाऱ्या उमेदवाराने रेल्वेत महिलेसोबत गैरवर्तन केले. छेडछाड करुन महिलेच्या गळ्यातील चैन आणि पर्स पळवली.
ऑक्टोबर 2015- नागौर येथे सैन्य भरतीसाठी जात असलेल्या युवकांनी रेल्वेत महिलांची छेडछाड केली. त्याचे साही सहकारी खाली राहिल्यामुळे वारंवार रेल्वेची चैन ओढत होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रेल्वेत सामान्य प्रवाशांना कोण-कोणत्या संकटांचा सामना करावा लागला