आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारु व्यापाऱ्यावर ITची रेड, 4 राज्यातील 55 ठिकाणांवर छापे; कोट्यवधींच्या कर चोरीची शंका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाल बाजारमध्ये वेदप्रकाश गोयल यांच्या घरावर छापा टाकण्यास गेलेली टीम - Divya Marathi
दाल बाजारमध्ये वेदप्रकाश गोयल यांच्या घरावर छापा टाकण्यास गेलेली टीम
भोपाळ - प्राप्तीकर खात्याने (आयटी) गुरुवारी सकाळी ग्वाल्हेरच्या दारु व्यापारी शिवहरे ग्रुपच्या चार राज्यातील 55 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांना शिवहरे ग्रुपने कोट्यवधी रुपयांची टॅक्स चोरी केल्याची शंका आहे.

कोणत्या राज्यात झाली छापेमारी
- प्राप्तीकर खात्याने वेगवेळ्या टीम तयार करुन गुरुवारी सकाळी शिवहरे ग्रुपच्या उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांतील विविध ठिकाणांवर छापे टाकले.
- मध्यप्रदेशातील भोलाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, सागर, बैतूल, शिवपुरी, कोलारस आणि सतना या ठिकाणी प्राप्तीकर खात्याने छापे टाकण्यासाठी टीम पाठवल्या.
- सूत्रांच्या माहितीनुसार, आयटी डिपार्टमेंटला शंका आहे की ग्रुपने कोट्यवधी रुपयांची टॅक्स चोरी केली आहे. अद्याप या छापेमारीत काय माहिती मिळाली हे उघड झालेले नाही.

यांच्यावर पडली रेड
- ग्रुपच्या ज्या लोकांवर छापेमारी झाली त्यात ग्वाल्हेरचे लक्ष्मीनारायण शिवहरे, आकाश शिवहरे आणि आशीष शिवहरे आहे. याशिवाय शिवपुरीचे रंजीत शिवहरे, बैतूलचे रणजीत शिवहरे आणि कोलारसचे रविन्द्र शिवहरे आहे.
- दाल बाजारमध्ये वेदप्रकाश गोयल आणि गोयल कोल्ड स्टोरेजवर छापेमारी झाली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दारु व्यापाऱ्याच्या आलिशान बंगल्यावर छापेमारी
बातम्या आणखी आहेत...