आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागडे डेकाेरेशन फेसबुकवर पाहून अायकर खात्याने पाठवली नाेटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - व्हाॅट्सअॅप, फेसबुकसारख्या साेशल मीडियाच्या माध्यमातून श्रीमंतीचे प्रदर्शन करणे महागात पडू लागले अाहे. येथील एका व्यक्तीचा १० हजार चाैरस फूट परिसरात बंगला अाहे. त्याने बंगल्याचे फाेटाे फेसबुकवर अपलाेड केले. त्यात टेरेस गार्डनसाेबतच महागडे कारंजे, विदेशी फर्निचर, झुमर, इंटेरिअर डिझाइनचे फाेटाे पाेस्ट केले. हे अायकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहिले अन् नाेटीस पाठवली अाहे.

अायकर अधिकाऱ्यांनी या संबंधित व्यक्तीच्या जुन्या अायकर रिटर्नची तपासणी केली तेव्हा ज्या पद्धतीने हा खर्च केलेला दिसत अाहे त्यानुसार पुरेसा कर भरणा केलेला नाही, असे निदर्शनास अाले. अायकर विभागाने अाता उत्पन्न अाणि खर्चाचा हिशेब मागितला अाहे. हे केवळ एक उदाहरण असून अायकर विभागाने अाता एक पथक या कामासाठी नेमले अाहे.

इंदूर विभागातील प्रमुख लाेकांचे फेसबुक प्राेफाइल अाणि अन्य साेशल मीडियावर अपलाेड केलेल्या माहितीचा तपास केला जात अाहे. या माहितीच्या माध्यमातून किती खर्च करण्यात अाला ते कळू शकते, शिवाय जुने अायकर रिटर्न तपासल्यानंतर जर संबंधित व्यक्तीने कमी उत्पन्न दाखवून कमी टॅक्स भरला असेल तर संबंधित अायकर अधिकाऱ्यास त्याची माहिती पाठवून नाेटीस बजावली जात अाहे.
साेशल मीडियावर हाेताे याचा शाेध
फेसबुक, साेशल मीडियावर लाेक सामान्यपणे मनमाेकळेपणे अापल्या खासगी बाबी शेअर करत असतात. उदा. विदेश प्रवास, महागडे हाॅटेल-क्लबमधील मुक्काम, नवीन घेतलेली कार, महागडी खरेदी, लग्नातील फाेटाेचे अल्बम इत्यादी.
बातम्या आणखी आहेत...