आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींना ध्वजारोहणाची संधी, पहाडी खुर्दच्या महिला सरपंचाचा निर्णय; मुलींच्या उत्साहाला उधाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिकमगड (इंदूर) - स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी शासकीय, निमशासकीय कार्यालये अन् शाळा-महाविद्यालयात ध्वजारोहण केले जाते. अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह राष्ट्रप्रेमाने भारलेले सामान्यजनही ध्वजारोहण समारंभात सहभागी होतात. बहुतांश ठिकाणी मान्यवर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळतो. मात्र, चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना यंदा हा मान मिळावा, असा निर्णय पहाडी खुर्द गावाच्या सरपंच मीरादेवी यादव यांनी रविवारी घेतला. त्यांच्या या निर्णयास सर्वांनीच आनंदाने पाठबळ दिले. हा सन्मान आपल्याला मिळणार या विचाराने ध्वजारोहणासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींना तर आकाशच ठेंगणे झाले आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच गुणी विद्यार्थिनींना हा सर्वोच्च सन्मान दिला जाणार आहे. या निर्णयाबाबत मीरादेवी यादव सांगतात, पहाडीखुर्द हे टिकमगड भागातील एक छोटेसे गाव आहे. दरवर्षी सरपंच किंवा पाहुण्यांच्या हस्तेच ध्वजारोहण केले जात असे; परंतु कुशाग्र विद्यार्थिनींना ध्वजारोहणाचा मान देत ग्रामस्थांना मुलीच्या शिक्षणासाठी प्रवृत्त करावे, असा विचार मनात आला. ग्रामपंचायत सदस्यांपुढे रीतसर प्रस्ताव ठेवत ग्रामस्थांशीही चर्चा केली. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करावे, यावर सर्वांचेच एकमत झाले. अशा विद्यार्थिनी निवडण्यासाठी रविवारी सर्वांनी बैठकही घेतली. यात इयत्ता आठवी ते एमएपर्यंत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. विद्यार्थिनींकडून मार्कशीट मागवून घेत अंतिम यादी ठरवण्यात आली. सर्व सदस्यांची सहमती मिळताच विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा प्रस्ताव
मंजूर करण्यात आला. आता या निर्णयाची माहिती प्रशासनालाही दिली जाणार आहे.

अभिनव निर्णयाने ग्रामस्थही सुखावले
सदस्यांच्या बैठकीतच मुलींची निवड
जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार
मुलगी असण्याचा गर्व

ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे ध्वजारोहणासाठी निवडलेल्या मुली खुश आहेत. राणू विश्वकर्मा आणि अभिलाषा तिवारी या दोघी म्हणाल्या, मुली असल्याचा आम्हाला आता गर्व वाटतो. मुलींचा हा सर्वोच्च सन्मान आहे. आतापर्यंत मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या हस्तेच ध्वजारोहण होत असे. मात्र, आपल्याच गावात लेकींना ध्वजारोहणाची संधी मिळतेय, असे पहिल्यांदाच घडणार आहे. गावातील वयोवृद्ध नागरिक मुन्ना पाल म्हणाले, जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार आहे. हा निर्णय आमच्या गावाने घेतला याचा अभिमान वाटतो.