आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Air Force Accident News In Marathi, Madhya Pradesh

PHOTOS: वायुदलाच्या अधिकाऱ्यांसाठी नदीत उडी मारणारा 16 वर्षीय मुलगा मगरींच्या हल्ल्यात ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- अमेरिकन बनावटीचे सुपर हर्क्युलस विमान कोसळले तेव्हा त्यातील वायुदलाच्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी 16 वर्षीय मुलाने मगरी असलेल्या चंबळ नदीत उडी मारली. परंतु, हा मुलगा अद्याप परतलेला नाही. मगरींनी त्याला ठार मारले असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा मृतदेहही सापडलेला नाही.
या मुलाचे नाव पचमया असे आहे. चंबळ नदीजवळ भारतीय वायुदलाचे विमान कोसळल्याचे वृत्त पसरल्यानंतर शेजारच्या गावांमधील गावकरी त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी लगेच याची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाला दिली. परंतु, गावातील काही लोकांनी पोलिसांनी वाट न बघता अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी चंबळ नदीत उड्या मारल्या. यावेळी त्यांनी याचाही विचार केला नाही, की या नदीत तब्बल 500 ते 700 मगरी आहेत. इतर गावकरी या नदीतून सुरक्षित बाहेर आले. परंतु, पचमया बाहेर येऊ शकला नाही. मगरींच्या हल्ल्यात तो ठार झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्याचा मृतदेहही सापडलेला नाही.
का आहे चंबळ नदी धोकादायक, वाचा पुढील स्लाईडवर, या दुर्घटनेची जिवाचा थरकाप उडविणारी छायाचित्रेही पुढील स्लाईडवर...