आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण रेषा ओलांडल्यास लष्कर सज्ज, घुसखोरी मोडून काढण्याचा विश्वास व्यक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोनियार - भारतीय लष्कराच्या पाकव्याप्त प्रदेशातील दहशतवाद्यांच्या छावण्यांवरील सर्जिकल स्ट्राईकने पाकला जाग आली असेलच, पुरेशी जाणीवही झाली असेल तरीही पाक लष्करी तुकड्यांनी आणि दहशतवादयांनी नियंत्रण रेषेपलिकडून पुन्हा कुठलीही आगळीक वा दु:साहस केल्यास त्याच योग्य भाषेत प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर कधीही तयारच आहे, आपली तयारी ही सर्वच कोनातून असते, असे लष्कराच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे.

भारतीय लष्करी तुकड्या या सदैव तयारच आहेत जर पाकने एलओसी पलीकडून दैनंदिन वा प्रासंगिक आगळीक केल्यास ते त्यांना महागात पडेल, असे श्रीनगरातील १५ तुकडीचे लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी पत्रकारांशी बोलतांना येथे सांगितले. ते म्हणाले, सीमेपलीकडून नेहमी घुसखोरीचा प्रयत्न होत असतो.

ते मी मान्य करतो पण भारतीय लष्कराचे कडे ओलांडून जाणे कठीणच असते, बहुतांश ठिकाणांवरुन ते अतिरेक्यांचे प्रयत्न सैन्य चकमकी गोळीबारातून हाणून पाडतेच. सीमेवर या प्रकाराचे अनेक पुरावे आहेत. मात्र दुआ यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलण्याचे टाळले.काही तरुण दहशतवादी कृत्यात सहभागी होताहेत हे खरे आहे. पोलीस खोऱ्यातील तरुणांमध्ये अतिरेकी विरोधी जनजागृती करत आहेत. त्यांची फळ यायला वेळ लागेल. पोलीसाच्याही खोऱ्यात अतिरेकी शोधात सातत्याने छापासत्र सुरु असते.
बातम्या आणखी आहेत...