भोपाळ- मध्य प्रदेशच्या राजधानीतील कोहेफिजाचा राहणारा कॉम्प्युटर इंजिनिअर हामीद अन्सारी, 2012 मध्ये प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानातील पेशावर येथे गेला होता. मात्र, पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला अटक केले. बेकायदा देशात घुसल्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात टाकले. कोर्टाने हामीदला 3 वर्षाचा कारावास सुनावला. 2015 मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाली. पण, पाकिस्तान सरकार त्याला सोडण्यास तयार नव्हते. अखेर 4 वर्षानंतर त्याच्या आईने केलेल्या प्रयत्नामुळे हामिदला पाकिस्तानी कारागृहातून सुटका करण्यात आल्याचे माहिती मिळाली.
कैदी असलेला हामिदला सुटका करण्यासाठी सोशल मीडियाची घेतली मदत...
- मुलाच्या सुटकेसाठी आई फौजिया अन्सारी यांनी भोपाळच्या सोशल अॅक्टिव्हिटीस आणि इंटिरिअर डिझायनर सैय्यद आबिद हसन यांना
फेसबुकवर संपर्क साधला.
- फौजियाने हामीदची करुण कहाणी सांगितल्यावर सोशल मीडीयात 'हेल्प हामिद' नावाचे पेज तयार करण्यात आले. वर्षभर हे मिशन चालवले. मिशनमध्ये 90 हजारांंहून जास्त लोकांचा सहभाग घेतला.
- सोशल मीडियाच्या नेटवर्किगमुळे पाकिस्तानी कारागृहाने हामिदची सुटका केल्याचे जाहीर केले. पाकिस्तान सरकारने 1 जानेवारीला हामिदच्या कुटुंबाला सुटका होण्याची माहिती दिली.
- हामिदचा भाऊ डॉ.खालिद अन्सारी याने सांगितले की, 4 वर्षांनंतर पाकिस्तानकडून आनंदाची बातमी आली आहे.
- विशेषतः पाकिस्तानातून जानेवारीमध्ये दोन जणांना सुटका होणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये दुसरे उत्तराखंडचे कुलभूषण जाधव याचाही समावेश आहे.
रमजानची कहाणी ऐकल्यावर हामीदही येऊ शकतो मायदेशात.. - हामिदच्या आईने सांगितले की, मुलाच्या सुटकेसाठी शासकीय कार्यालयात चपला झिजवल्या. मात्र, प्रत्येक वेळी पदरात निराशाच पडली.
- अनेक भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडूनही हामीदच्या सुटकेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
- यादरम्यान, वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांमध्ये पाकिस्तानात अशाच प्रकारे अडकलेल्या रमजानची कथा फौजिया यांनी समजली. पुन्हा एकदा आशेचा किरण दिसला आणि त्यांनी मुलाला मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
- रमजान पाकिस्तानातून भारतात सुखरुप कसा परतला? याबाबत फौजिया यांनी आबिद याच्याकडून माहिती करून घेतली.
- आबिद याने त्याच्या फेसबुक आणि ट्विटरच्या अकाऊंटवरून पाकिस्तान आणि भारत सरकारमधील नेत्यांशी संपर्क साधला.
- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजा यांनी पाकिस्तान सरकारला हामीदच्या सुटकेबाबत विनंती केली. तेव्हा कुठे हामीदला सोडण्यास पाकिस्तान सरकार तयार झाले आहे.
सोशल मीडियावर लोकांच्या सहभागातून मिळाले यश...
- सामाजिक कार्यकर्ते आबिद हुसेन म्हणाले की, हामिदच्या आईने माझ्याशी एक वर्षांपूर्वी संपर्क केला होता. या कामात सोशल मीडियाची मदत घेण्यात आली.
- त्याच्या दुसऱ्या दिवशी ट्विटरमध्ये #helphamid ट्रेंड बनविले आणि ट्रेंड बनविल्यानंतर नॅशनल स्तरावर कंमेंट्स यायला लागल्या. फेसबुकच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना संपर्क साधला.
पुढील स्लाईडवर पाहा, हामिदची सुटका करण्यासाठी सोशल मीडियावर चालवल्या मिशनचे काही फोटोज...