आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railway Website Updation And Got New Facilities

रेल्वेची प्रवाशांना अनोखी भेट..आता सब कुछ Website वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - रेल्वे प्रवाशांची सर्वाधिक लोकप्रिय असलेले संकेतस्थळ www.indianrail.gov.in अद्ययावत करण्‍यात येत आहे. जर कोणाला भारतीय रेल्वेविषयी विशेष माहिती हवी असले तर आता वेगवेगळ्या संकेतस्थळावर जाण्‍याची गरज नाही. एकाच वेबपेजवर दिलेल्या लिंकवर सर्व माहिती मिळू शकते. याव्यतिरिक्त संकेतस्थळाची गती वाढवण्‍यासाठी स्वातंत्र सर्व्हर उपलब्ध करून देण्‍यात आलेला आहे. त्यामुळे पीक अवर्सच्या दरम्यान गती मंदावणार नाही.

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम (क्रिस) च्यावतीने संकेतस्थळाला अद्ययावत केले जात आहे. विशेषत: होमपेजच्या डिझाइनकडे विशेष लक्ष दिले जात आहे. संकेतस्थळाला भेट देणा-यांना सर्व माहिती स्पष्‍ट दिसणार आहे. प्रवाशांसाठी रेल्वेची सर्व साइट्स एकाच ठिकाणी लिंक करण्‍यात आले आहे.


पुढील स्लाइडवर वाचा काय असेल विशेष आणि कसे वापरावे संकेतस्थळ.......