आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींच्या बंगल्यात राहतात सलमानचे\'वकील साहेब\', Lifestyle नवाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आलिशान घरात हरीश साळवे. - Divya Marathi
आपल्या आलिशान घरात हरीश साळवे.
भोपाळ - हिट अँड रन प्रकरणी शेवटी सलमान खान आरोप मुक्त झाला आहे. त्याला या प्रकरणातून निर्दोष बाहेर काढण्‍यात सर्वात महत्त्वाची भूमिका वकील हरीश साळवे यांनी पार पाडली आहे. साळवे यांचा भारतातील सर्वात चांगले वकील म्हणून गणना केली जाते. त्यांचा जगातील सर्वात 10 महागड्या वकीलांमध्‍येही समावेश होतो. हरीश साळवे हे मध्‍य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवाशी आहेत. त्यांचे वडील एन.के.पी साळवे मध्‍य प्रदेशच्या बैतूलमधून दोनदा लोकसभेत निवडून गेले आहेत. ते बीसीसीआयचे अध्‍यक्षही होते. आपल्या आरामदायी जीवनशैलीमुळे हरीश साळवेंना मीडिया 'नया नवाब' असेही संबोधते.
लक्झरी गाडी बेंटलेचे शौकीन, 100 कोटींचा बंगला :
आता हरीश साळवे दिल्लीत स्थ‍ायिक झाले आहेत. दिल्लीतील उच्चभ्रू पालम मार्गावर एक भव्य अशा बंगल्यात राहतात. बंगल्याची किंमत 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. तसेच ते फक्त लक्झरी गाडी बेंटलेमधूनच फिरतात. गोव्यातील आपल्या बंगल्यात ते सुट्ट्या घालवतात. ते फॅशन कॉन्शिअस आहेत. लंडनमध्‍ये खरेदी करतात. त्यांना पियानो वाजवायला आवडते.
एक तारखेला घेतात 60 लाख ते एक कोटी रुपये :
हरीश साळवे यांचा भारतातच नव्हे तर जगातील सर्वात महागड्या वकिलांमध्‍ये समावेश होतो. ते एका खटल्यासाठी 60 लाख रुपये ते एक कोटी रुपये घेतात. रतन टाटांपासून ते मुकेश अंबानी या सारख्‍या उद्योगपतींच्या बाजूने साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात केस लढले आहेत. अंबानी बंधूंच्या गॅस वादात मुकेश अंबानींच्या बाजू केस लढली आणि जवळजवळ 15 कोटी रुपयांची फीस वसूल केली. 1999 ते 2002 पर्यंत ते भारताचे सॉलिसिटर जनरल राहिले आहेत.
पत्नीच्या नाराजीमुळे सोडले सॉलिसिटर जनरल पद :
हरीश साळवे यांनी 2002 मध्‍ये दुस-यांदा भारताचे सॉलिसिटर जनरल होण्‍यास नकार दिला होता. सॉलिसिटर जनरल भारताचा मुख्‍य कायदा सल्लागार अॅटॉर्नी जनरलच्या अंकित काम करत असतो. माझी पत्नी कार्यालयातील कामे घरी आणून ती करणे आणि संध्‍याकाळी वृत्त वाहिन्या पाहणे हे आवडत नसे म्हणून दुस-यांदा पद स्वीकारले नसल्याचे सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा हरीश साळवे यांची छायाचित्रे...