आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमात अपयश; युवतीची आत्महत्या, अखेरचे शब्द- मी किनाऱ्यावर तुझी वाट पाहाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखाचा मृतदेह - Divya Marathi
रेखाचा मृतदेह
इंदूर - प्रेमात अपयश आल्यामुळे एका प्रेमी युगुलाने मंगळवारी दुपारी एकानंतर एक नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात युवतीचा मृत्यू झाला तर युवकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. प्रेमी जोडप्याने शिप्रा नदीत उडी घेतली होती. मृत तरुणीचे नाव राखी तर युवकाचे नाव अनिल आहे. दोघांचे कुटुंबिया शिप्रा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.
युवती स्कुटीवर आली तर युवक बाइकवर
शिप्रा पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार राममूर्ती शाक्य यांनी सांगितले, की आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान युवक आणि युवतीने नदीत उडी घेतल्याचे नदी काठाजवळील गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तिथे उपस्थित लोकांनी सांगितले, की साधारण 12 वाजता एक युवती स्कुटीवर आली. तिने किनाऱ्यावर गाडी उभी करुन पायी चालत नदीपात्राकडे आली आणि नदीत उडी घेतली. थोड्या वेळाने एक युवक बाइकवर आला आणि त्यानेही गाडी उभी करुन नदीत उडी घेतली. त्याला बुडताना काही लोकांनी पाहिले आणि त्यामुळे त्याला वाचवण्यात आले. त्याने पहिला प्रश्न केला की युवती कुठे आहे. तेव्हा लोकांनी पुन्हा नदीत शोधाशोध केली, मात्र तोपर्यंत उशिर झाला होता.

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अनिलने सांगितली स्वतःची प्रेमकथा
मी आणि राखी दोघेही 19 वर्षांचे... आमचे घर समोरा-समोरच आहे. आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते, मात्र आमच्या कुटुंबियांना ते आवडत नव्हते. ते आम्हाला भेटू देत नव्हते, बोलू देत नव्हते. कारण आम्ही वेगवेगळ्या जातीचे आहोत. आम्हाला वाटत होते, की दोन्ही कुटुंबिय आम्हाला कधीच एकत्र येऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही एकत्र जीव देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मी आणि राखी आयुष्याच्या अखेरच्या प्रवासाला निघालो. आम्ही सोबतच जीवन संपवणार होतो, मात्र माझ्या गाडीतील पेट्रोल संपले आणि मी मागे पडलो...

मी किनाऱ्यावर तुझी वाट पाहाते...
माझ्या गाडीतील पेट्रोल संपल्यानंतर मी तिला थांबायला सांगितले, त्यावर ती म्हणाली तू गाडीत पेट्रोल भरून ये मी किनाऱ्यावर तुझी वाट पाहाते. मी पेट्रोल भरत असतानाच तिचा फोन आला, 'मी जात आहे, आता तू स्वतःची काळजी घे.' हे ऐकताच मी तिला थोडावेळ वाट पाहाण्यास सांगितले पण तिने फोन कट केला होता. मी तातडीने नदीच्या दिशेने निघालो. किनाऱ्यावर राखीचा स्कार्फ, चष्मा आणि सँडल दिसली पण ती तिथे नव्हती. तेव्हाच काही लोक एक मुलगी नदीत बुडाली असे ओरडत धावत आले. ते ऐकताच मी देखील नदीत उडी मारली. मला बुडताना पाहून त्यांनी मला वाचवले, पण राखीला कोणीही वाचवू शकलो नाही.
मृतदेह पीएमसाठी इंदूरला
राखीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी इंदूरला पाठवण्यात आला आहे. पोलिस अनिलकडे चौकशी करत आहे. दरम्यान त्यांचे कुटुंबिय पोलिस स्टेशनमध्ये आले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत फोटो