आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाने वडिलांच्या प्रेयसीची केली निर्घृण हत्या; संतापाच्या भरात मृतदेह केला विवस्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा/इंदूर- तीन भावांच्या मदतीने एका महिलेची निर्घृण हत्या करून तिला विवस्त्र करणार्‍या आरोपी रक्षाची कहाणी अत्यंत खेदजनक आहे. रक्षाने चार दिवसांपूर्वी निर्मला नामक महिलेची निर्घृण हत्या केली होती.

रक्षाने निर्मलाची हत्येनंतर मृतदेह का केला विवस्त्र...?
- पिपलिया तहारची राहाणारी निर्मला भीमसिंह राजपूत हिची रक्षा व तिच्या तीन अल्पवयीन भावांनी हत्या केली. रक्षाच्या मनात निर्मलाविषयी इतका राग होता की, तिने संतापाच्या भरात निर्मलाच्या मृतदेहाला विवस्त्र केले.
- रक्षाने सांगितले की, मृत निर्मला व तिच्या वडिलांचे अनैतिक संबंध होते. निर्मलाच्या सांगण्यावरून तिचे वडील आईला मारझोड करायचे. आईचा बदला घेण्यासाठी रक्षाने हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.
- आईवर होणारे अत्याचार पाहून ती रक्षा दु:खी होत होती. निर्मलाच्या सांगण्यावरून रक्षाचे वडील तिच्या आईवर अत्याचार करत होते.
- निर्मलाची हत्या करून मृतदेह का केला विवस्त्र? या प्रश्नवर उत्तर देताना रक्षाने सांगितले की, वडील तिच्या आईला इतके मारायचे की, तिच्या अंगावरील कपडे देखील फाडून टाकत असत.
- निर्मला रागात असायची तेव्हा रक्षाचे वडील तिच्या आईला बेदम मारहाण करायचे.

पुढील स्लाइडवर वाचा, रक्षा म्हणाली, मोडायचे होते निर्मलच्या पायाचे हाड व पाठीचा मणका...
बातम्या आणखी आहेत...