आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RAPE चा आरोप करुन थाटले स्वतःचे लग्न, अशी आहे ही क्रिमिनल माईंडेड गर्ल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश) - शिल्पा नवाची ही तरुणी अतिशय चतूर आहे. लूटीच्या प्रकरणात पोलिसांनी तिला, तिचा भाऊ पंकजसोबत पकडले. कोर्टाने तिला कडक शब्दात सुनावले आणि त्यानंतर जामीन मंजूर केला. शिल्पा गुन्हेगारीत एवढी पुढे गेली आहे की तिने तिच्या बॉसवर बलात्काराचा आरोप करुन त्याच्यासोबत बळजबरी लग्न केले होते. लग्नानंतर हिच्या छळाला वैतागून पतीने मृत्यूला जवळ केले होते.
वाचा, साधी-भोळी दिसणाऱ्या शिल्पाच्या क्रिमिनल माइंडने पोलिसही चक्रावून गेले
एका भूरट्या चोरीने फुटेल बहिण-भावाच्या लूटमारीचे बिंग
> हीरानगर आणि विजयनगर परिसरात 28-29 जुलै दरम्यान एका अॅक्टिव्हावरुन आलेल्या युवकाने तीन तरुणींवर चाकूने वार करुन त्यांच्या अंगावरील सोने लुटले होते.
> हीरानगरचे पोलिसांच्या टीमने भररस्त्यात लूटमार करणाऱ्या पंकज श्रीचंद चंदानी याला त्याच्या चार साथिदारांसह अटक केली.
> आरोपींकडून दोन पिस्तूल, चार काडतूस, दोन तलवारी, एक चाकू, गुंगीच्या 24 गोळ्या, एक अॅक्टिवा, बाइक, चार मोबाइल जप्त करण्यात आले.
> पंकज ज्या अॅक्टिवावर बसून लुटमार करत होता ती त्याची बहिणी शिल्पाची असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले.
> पोलिसांनी आणखी कसून चौकशी केल्यानंतर पंकजने सांगितले की तो जे काही करतो त्याची पूर्ण माहिती त्याच्या बहिणीला असते. एवढेच नाही तर लूटीचा मालही तिच्याकडेच जमा असतो आणि रस्त्यात महिलांना कसे लुबाडायचे याच्या नवनव्या आयडिया देखील तिच त्याला देते.
> लुटीचा पैसा शिल्पाच खर्च करते. पंकजच्या या जबाबानंतर पोलिसांनी तिलाही बेड्या ठोकल्या.
> शिल्पाने जामीनासाठी कोर्टात अर्ज सादर केला, त्यावरुन कोर्टाने तिला कडक शब्दात फटकारत जामीन मंजूर केला आहे, तर तिचा भाऊ पंकजला तुरुंगात पाठवले.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून समजून घ्या शिल्पाचा क्रिमिनल माइंड...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...