आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत : 24 सशस्‍त्र दरोडेखोरांनी लुटली ट्रेन, GRP पोलिस लपून बसले होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - इंदूरवरून कोटा येथे जाणा-या इंटरसिटी एक्सप्रेसमध्‍ये शनिवारी रात्री सशस्‍त्र दरोडा पडला. कुंभराज स्टेशनच्‍या समोर ही घटना घडली. सुमारे दोन डझन सशस्त्र आरोपी समोरून तिस-या क्रमांकाच्‍या सेकंड क्लास बोगीमध्‍ये शिरले. त्‍यांनी 30 पेक्षा अधिक प्रवाशांचे साहित्‍य लुटले. महिलांचे मंगळसुत्र व इतर दागिनेही चोरट्यांनी पळवले आहेत. जीआरपी अधिका-यांची कोणतीही मदत न मिळाल्‍याने प्रवाशांनी रेल्‍वे प्रशासनाविरोधात संताप व्‍यक्‍त केला आहे. दरोडेखोरांनी केलेल्‍या दगडफेकीत एक जण जखमी झाला आहे.
बोगीत 20 मिनीट दरोडेखोरांची दहशत
- रात्री सुमारे 8 वाजता इंटरसिटी कुंभराज स्टेशनहून निघाली.
- रुठियाईच्‍या मार्गावर 4-5 किमी अंतरावर अचानक कुणीतरी रेल्‍वेची चेन ओढली.
- बोगीत एका मागे एक काही लोक चढले.
- दरोडेखोरांकडे धारदार शस्‍त्र, काठ्या होत्‍या. काहींकडे बंदुकही होती.
- काही दरोडेखोर ट्रेनच्‍या खाली उभे होते.
- आरोपींनी प्रवाशांच्‍या बॅग हिसकावल्‍या, महिलांचे दागिनेही लुटले.
- दरोडेखोरांनी लुटलेले प्रत्‍येक साहित्‍य त्‍यांनी खाली फेकले. 15 ते 20 मिनीट बोगीत दहशत होती.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, बोगीतील जखमी प्रवासी..