Home | National | Madhya Pradesh | Indore rto seized buffalo in lieu dhar of arrears recovery

गाड्या न मिळाल्याने आरटीओकडून म्हशी जप्त; इंदूरच्या आरटीओने केली कारवाई

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 08, 2016, 06:31 AM IST

परिवहन विभागाने गाड्या आणि त्यांचा थकीत कर न मिळाल्याने गाडी मालकाच्या १० म्हशी जप्त केल्या. इंदूरच्या आरटीओने धार येथे जाऊन ही कारवाई केली. सध्या सर्व गाड्यांच्या मालकांना थकीत ४.३७ लाख रुपये जमा करण्यासाठी सात दिवसांची वेळ देण्यात आली आहे.अन्यथा म्हशी इंदूर येथे आणल्या जातील आणि त्या विकून थकीत रक्कम वसूल केली जाईल.

  • Indore rto seized buffalo in lieu dhar of arrears recovery
    इंदूर/धार- परिवहन विभागाने गाड्या आणि त्यांचा थकीत कर न मिळाल्याने गाडी मालकाच्या १० म्हशी जप्त केल्या. इंदूरच्या आरटीओने धार येथे जाऊन ही कारवाई केली. सध्या सर्व गाड्यांच्या मालकांना थकीत ४.३७ लाख रुपये जमा करण्यासाठी सात दिवसांची वेळ देण्यात आली आहे.अन्यथा म्हशी इंदूर येथे आणल्या जातील आणि त्या विकून थकीत रक्कम वसूल केली जाईल.

    परिवहन विभागाने महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली होती. त्यात असे आढळले की, आरटीओचाच एक एजंट संजय शर्मा याच्या नावावर आणि वेगवेगळ्या पत्त्यांवर ३५१ गाड्यांची नोंदणी झाली आहे. त्याच्याकडून विभागाला अडीच लाख रुपयांची वसुली करायची आहे. विभागाने एजंटला नोटीस जारी करून रक्कम जमा करावी अन्यथा त्याची संपत्ती जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यावर एजंटने सुमारे १०० गाड्यांवर थकित ८० लाख रुपये जमा केले होते, पण बाकीच्या गाड्या धार, देवास आणि खरगोनसहित इतर ठिकाणी आहेत. त्यावर आरटीओ डॉ. एम. पी. सिंह यांनी परिवहन आयुक्त डॉ. शैलेंद्र श्रीवास्तव यांना शहराबाहेर जाऊन कारवाईची परवानगी मागितली.

    परवानगी मिळाल्यावर ते रविवारी पथकासह धार येथे पोहोचले. तेथे धारच्या आरटीओला सोबत घेऊन एजंटने सांगितलेल्या ज्ञानपुरा येथील पत्त्यावर गेले. तेथे अजय आणि पंकज यादव यांच्या नावावर तीन डंपरची नोंदणी झाली होती. त्यांच्याकडून विभागाला ४.३७ लाख रुपये थकबाकी वसूल करायची होती.

    आरटीओने सांगितले की, मालकांना गाड्यांबाबत विचारले तेव्हा त्याने कुठलीही माहिती दिली नाही. गाडी मालकांच्या घराबाहेर मोठा गोठा होता. त्यात १०० पेक्षा जास्त म्हशी होत्या. थकबाकी जमा न केल्याने आणि गाड्यांची माहिती न दिल्याने विभागाने १० म्हशी जप्त केल्या. तेथेच म्हशींची देखभाल करणाऱ्या व्यक्तीकडे या म्हशी सुपूर्द करण्यात आल्या. १० दिवसांत थकबाकी जमा करा अन्यथा म्हशींची इंदूरमध्ये विक्री करून थकबाकी वसूल करण्यात येईल, असा इशारा गाड्यांच्या मालकांना देण्यात आला आहे.

Trending