आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Yr Old Shivani Rape And Murder Case Culprits Capital Punishment Suspended National

4 वर्षांच्या चिमुकलीचा गँगरेपनंतर केला होता खून, आरोपींची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली पण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नराधमांनी 4 वर्षांच्या शिवानीवर गँगरेप करून खून केला होता. - Divya Marathi
नराधमांनी 4 वर्षांच्या शिवानीवर गँगरेप करून खून केला होता.
इंदूर - शिवानी बलात्कार व हत्याकांडातील तीन गुन्हेगारांनी फाशी टळावी म्हणून दाखल केलेली दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर केली आहे. परंतु त्यांच्या फाशीवर अजूनही स्पष्टत नाही. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर तिन्ही आरोपी जितेंद्र, केतन व देवेंद्रने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर अजूनपर्यंत कोणताही निर्णय आलेला नाही. याबद्दल सेंट्रल जेलने सुप्रीम कोर्टाला मार्गदर्शन मागितले आहे.
 
असे होते प्रकरण...
- 24 जून 2012 रोजी रात्री न्यू पलासियामध्ये लक्ष्मी मेमोरियल हॉस्पिटलच्या जवळ 4 वर्षांची शिवानी आपल्या घरासमोरून जाणारी एका लग्नाची वरात पाहत होती. तेवढ्यात जितू आणि सन्नी एका ऑटोत बसून तेथे आले. ऑटोला बाबू ऊर्फ केतन चालवत होता. तिघांनी वरात पाहणाऱ्या चिमुकल्या शिवानी ऑटोत बसवले आणि मालवीय नगरच्या सुनसान परिसरात घेऊन गेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला.
 
सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली फाशी
- तिन्ही खुन्यांना 26 एप्रिल 2013 रोजी तत्कालीन अपर सत्र न्यायाधीश इंद्रा सिंह यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टात अपली केल्यानंतर जस्टिस एसके सेठ व जस्टिस पीके जायसवाल यांनी 21 ऑगस्ट 2014 रोजी निर्णय सुनावत जिल्हा न्यायालयाच्या या फाशीच्या निर्णयाला कायम ठेवले. यानंतर सुप्रीम कोर्टानेही यात बदल केला नाही. सुप्रीम कोर्टात केस हरल्यानंतर आरोपींनी राष्ट्रपतींना दया याचिका केली होती.
 
राष्ट्रपतींनीही फेटाळली दया याचिका
- सुप्रीम कोर्टात फाशीची शिक्षा कायम राहिल्यावर तिन्ही आरोपींनी तेथे एक पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यानंतर त्यांनी कमी वय आणि कुटुंबात इतर कोणीही कमावणारा नसल्याचा तर्क देऊन राष्ट्रपतींना माफीची अपील केली होती. राष्ट्रपतींनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.
 
...पण यामुळे फाशीचा होत नाहीये निर्णय
- सेंट्रल जेल अधीक्षक आर.सी. आर्य यांनी DivyaMarathi.Com ला सांगितले की, राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी सुप्रीम कोर्टात एक पुनर्विचार याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती महोदयांनी त्यांची दया याचिका फेटाळून लावली, परंतु सुप्रीम कोर्टातील पुनर्विचार याचिकेवर अजूनही कोणताही निर्णय आलेला नाही. यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार यांना पत्र लिहून या आरोपींना फाशी द्यावी की सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करावी याबद्दल त्यांचा सल्ला मागितला आहे. त्यांच्या पत्राच्या आधारे जेल प्रशासन याप्रकरणी पुढील कारवाई करणार आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...