आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने नवऱ्याचा गळा दाबला; सेफ्टीपिन पायाला टोचून म्हणाली- साप चावलाय, शॉकिंग होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीमा सिंह हिने लॅब असिस्टंट पतीचा गळा आवळून खून केला. - Divya Marathi
सीमा सिंह हिने लॅब असिस्टंट पतीचा गळा आवळून खून केला.
भोपाळ - एमपीच्या भोपाळमध्ये फूड क्वालिटी कंट्रोल सेलच्या लॅब असिस्टंट सुरेश सिंह यांच्या खुनाचा उलगडा कमलानगर पोलिसांनी केला आहे. खून सुरेश यांची पत्नी सीमानेच केला होता. कारण ऐकून चकित व्हायची पाळी पोलिसांवर आली. सुरेश प्रत्येक लहान-मोठ्या खर्चाचा हिशेब विचारायचे. त्यांनी त्यांच्या जीपीएफच्या रकमेतील 20 टक्के हिस्सा पत्नीच्या नावे, तर 80 टक्के हिस्सा मुलगा शुभमच्या नावे केला होता.
 
असे आहे प्रकरण...
- टीआय आशिष भट्टाचार्य यांच्या मते, घरखर्चावरून सुरेश आणि सीमामध्ये नेहमी भांडणे व्हायची. मंगळवारी सकाळीही दोघांत याच गोष्टीमुळे जोरदार भांडण झाले. बाचाबाचीपर्यंत वेळ आल्यावर सीमाने नवऱ्याला जोरदार धक्का दिला. त्यांचे डोके भिंतीला आदळले आणि ते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले.
- चिडलेल्या सीमाने एवढ्यावरच न थांबता पतीचा गळा दाबला. नवऱ्याने दोनदा हिचकी घेतली आणि तत्काळ त्याने जीव सोडला. काही वेळ विचार केल्यानंतर सीमाने आपल्या सेफ्टी पिनने त्याच्या डाव्या पायावर सर्पदंशाच्या खुणा केल्या.
- यानंतर आपल्या घरमालकाला सांगितले की, सापाने सुरेशला दंश केला आहे. मग दोघेही त्याला घेऊन रुग्णालयात गेले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
 
असा झाला खुनाचा उलगडा
- कमलानगरचे रहिवासी 56 वर्षीय सुरेश सिंह यांच्या खुनाचा उलगडा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाला. या आधारावर पोलिसांनी गुरुवारी रात्री सीमाला नवऱ्याच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे.
 
खाल्ले होते विषारी औषध
- पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुरेशने सीमाशी दुसरे लग्न केले होते. लग्नानंतरच दोघांत छोट्या-छोट्या कारणांमुळे वाद सुरू झाले होते.
- लग्नाच्या काही दिवसांनी सीमाने परेशान होऊन एकदा मुंग्या मारण्याचे औषध खाल्ले होते. तेव्हा जबलपूरच्या पोलिस स्टेशनमध्ये दोघांना समजूत घालण्यात आली होती.
- ही गोष्ट सीमाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितली आहे. म्हणाली की, सुरेश साधे धणे खरेदी केल्यावरसुद्धा टोकायचा. छोट्या-छोट्या खर्चाचा हिशेबही मागायचा.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, एका पत्नीने कसे संपवले पतिदेवाला...
बातम्या आणखी आहेत...