आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांच्या मुलासमोर आईवर अत्याचार; रडतच आईने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - शाजापूरमध्ये एका 4 वर्षीय चिमुकल्यासमोरच बलात्कार झालेल्या महिलेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात दीड वर्षानंतर आरोपीला कोठडी मिळाली आहे. आईसोबत झालेल्या अत्याचाराची घटना अल्पवयीन बालकाने न्यायालयात सांगितली. चिमुकल्याच्या साक्षीने जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र प्रसाद शर्मा यांनी आरोपीला 10 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

 

4 वर्षांच्या बालकाने दिली साक्ष
> आरोपीने जेव्हा अत्याचार केले, तेव्हा महिलेचा 4 वर्षांचा मुलगाही घरात होता. नंतर बालकाने आपल्या समोर घडलेली घटना पोलिसांना सांगितली. तो म्हणाला की, आई रडतच खोलीत गेली होती. शेजारी महिलेनेही आरोपीला घराबाहेर निघताना पाहिले होते. बालक आणि शेजारी महिलेच्या साक्षीवरून आरोपीला महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे यासाठी दोषी ठरवत कलम 306 नुसार 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सोबत 1 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम जमा न केल्यास आरोपीला 6 महिने अतिरिक्त तुरुंगवासात राहावे लागेल.
> आरोपीच्या वकिलांनी न्यायाधीश शर्मा यांच्या पुढे त्याच्या वयाचा दाखला देत त्याला दोषमुक्त करण्याची बाजू मांडली. वकिलांचा तर्क होता की, तो नवयुवक आहे. यामुळे त्याला कोणताही दंड न ठोठावता निर्दोष मुक्त केले जावे. 
> न्यायाधीशांनी निकालात म्हटले की, आरोपीकडून महिलेच्या घरात वाईट हेतूने प्रवेश करण्यात आला आणि छेडछाडीच्या घटनेशी संबंधित असे कृत्य करण्यात आले ज्यामुळे महिला आत्महत्येस प्रवृत्त झाली. अशा स्थितीत समाजात या प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आरोपीला शिक्षा देऊन दंडित करणेच योग्य राहील.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमधून या प्रकरणाचा घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...