आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नी बनून हॉटेलात केली रूम; तरुणी म्हणाली, त्याने रेप केला, मेला कसा माहीत नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - देवासच्या एका हॉटेलमध्ये एका मुलासह बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तरुणीला शुद्ध आली आहे, तर मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रेमप्रकरणाच्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. परंतु, मुलगी म्हणते की, तिला येथे बळजबरी आणून दारू पाजण्यात आली, मग बलात्कार करण्यात आला आणि आत्महत्या करण्यासाठीही दबाव टाकण्यात आला.
 
असे आहे प्रकरण...
- पोलिसांना दिलेल्या जबाबात तरुणी म्हणाली की, मृत मुलगा तिचा नात्याने भाऊ लागत होता. तो तिला देवासमध्ये फिरायला नेण्याच्या बहाण्याने घेऊन आला. येथे त्याने बस स्टँडजवळच्या सुदर्शन लॉजमध्ये नेले. लॉजमध्ये आल्यावर तिला दारू पाजली आणि बलात्कार केला. यानंतर मुलगा बाथरूमला गेल्यावर, ही संधी साधून तिने फोन करून आपल्या नातेवाइकांना देवासमध्ये असल्याची माहिती दिली.
- पोलिसांनी तिला विचारले की, फोन केला तेव्हाच का पळून गेली नाहीस? किंवा आरडाओरडा का केला नाहीस? याचे तिच्याकडेच कोणतेच उत्तर नव्हते. कोतवालीचे टीआय आर.एस. भदौरिया म्हणाले - प्राथमिकदृष्ट्या हे प्रेमप्रकरण वाटत आहे. मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
 
पती-पत्नी असल्याचे सांगितले आणि मतदार कार्ड दाखवून थांबले
- 17 ऑगस्टला इंदुरातील केलाखेडीचा मनीष परमार गावातल्या एका तरुणीला घेऊन देवासला पोहोचला आणि येथे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बस स्टँडवरील सुदर्शन लॉजमध्ये थांबला. येथे दोघांनी स्वत:ला पती-पत्नी असल्याचे सांगितले.
- तरुणाने ओळखीच्या रूपात मतदार कार्ड दाखवले. शंका आल्याने एका खबऱ्यानेच पोलिसांना ही बाब कळवली होती. यानंतर पोलिसांनी रात्री अचानक खोलीत धाड टाकली, तर तरुण मृतावस्थेत आढळला, तर जवळच तरुणी बेशुद्ध पडलेली होती.
 
मृत तरुणाचा भाऊ म्हणाला, तिच्यावर विश्वास नाही.. काहीतरी काळंबेरं आहे...
- पोलिसांनी शनिवारी पुन्हा एकदा मृताच्या नातेवाइकांना चौकशी केली. तेव्हा मृताचा भाऊ संजय पोलिसांना म्हणाला की, मनीषचा एका षड्यंत्रामुळे खून झाला आहे. तो म्हणाला की, ती साफ खोटे बोलत आहे. माझा भाऊ असा नव्हता. माझ्या भावाने तिला जर बळजबरी आणले असते तर तिने आरडाओरडा का केला नाही?
- संधी मिळाल्यावर ती पळून का गेली नाही? त्याने मुलीवरच संशय घेतला आहे. सोबतच म्हणाला की, माझा भाऊ दारू प्यायचा, पण त्याला एकटा माणूस मारूच शकणार नाही. यामागे नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे.
 
लग्न झाले होते, पण मोडले
- मुलीच्या वडिलांनी सांगितले, "5 मे 2011 ला गावातल्याच मुलाशी तिचे लग्न लावले होते. पण तो मुलगा नशा करायचा. यामुळे मुलीने संबंध तोडले. मला एक मुलगा, एक मुलगी आहे. यात मुलगीच मोठी आहे. जे काही झाले त्याचे मला प्रचंड वाईट वाटतेय, मनीषने असे का केले? या दोघांत काय झाले देवाला माहीत..."
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मुलीने पोलिसांना सांगितलेले त्या रात्रीबाबतचे 'सत्य'... आणि PHOTOS
बातम्या आणखी आहेत...