आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज 400 विटा बनवते 9 वर्षांची डॉली, आता झाली देशाची सर्वात छोटी नेमबाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉली जाटव फक्त 9 वर्षांची असून घरची प्रचंड गरिबी असूनही तिने नावलौकिक मिळवला आहे. - Divya Marathi
डॉली जाटव फक्त 9 वर्षांची असून घरची प्रचंड गरिबी असूनही तिने नावलौकिक मिळवला आहे.
इंदूर - 9 वर्षांची डॉली जाटवा... आईवडील वीटभट्टीवर काम करतात. डॉलीही त्यांना कामात मदत करते. ती रोज तब्बल 400 विटा बनवते. डोईवरल्या अवजड विटा तिच्या कोवळ्या हातांनी धगधगणाऱ्या तप्त भट्टीत नेऊन टाकते. या संघर्षाने तिच्या हातांनाच नाही तर तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीलाही आणखी मजबूत बनवले आहे.
 
डॉलीने जिंकले गोल्ड मेडल
- 3- 3.5 फूट उंची आहे डॉलीची, पण दीड किलो वजनी ऑस्ट्रेलियन गन ईवोटेनने असा काही निशाणा लावते की शूटर्स पाहतच राहतात. नुकतेच जयपूर शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये डॉलीने गोल्ड आणि सिल्व्हर मेडल जिंकले. 
- डॉलीने ट्रेनिंग सुरू करून फक्त 1 वर्ष लोटले आहे. हो, ती फक्त ट्रेनिंगच घेतेय. मागच्या 10 दिवसांपासून ती बीएसएफ इंदूरच्या सेंट्रल स्कूल ऑफ व्हेपन्स अँड टेक्टिक्समध्ये ट्रेनिंग घेत आहे. 
- डॉलीने देशातली सर्वात कमी वयाची शूटर म्हणून ओळख निर्माण केली आहे. बुधवारपासून बीएसएफमध्ये सुरू झालेली देशाची पहिली नाइट शूटिंग कॉम्पिटिशनसाठी डॉली तिच्या आईवडिलांसह शहरात आली. 
 
अशी आहे डॉलीची कहाणी...
- उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील जोहडी गावात राहते डॉली. देशाचे सर्वात वरिष्ठ शूटर चंद्रो तोमरही याच गावाचे आहेत. त्यांचे वय 86 वर्षे आहे. डॉलीची आई सुनीता यांना वाटायचे की, आपल्याप्रमाणे डॉलीचे आयुष्य असेच भट्टीच्या आगीत खाक होऊ नये. या गावातील बहुतांश मुली नेमबाजीच्या आधाराने आर्मी, ओएनजीसी आणि एअर इंडियात काम करताहेत. गावात तब्बल 100 मुली शूटिंग शिकत आहेत. म्हणूनच दोन वर्षांपूर्वी त्यांनी जोहडी शूटिंग रेंजवर चिमुकल्या डॉलीला सोबत नेले. तिथे कोच आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज डॉ. राजपाल सिंह यांची भेट घेतली. राजपाल सिंह सांगतात, एवढी छोटी मुलगी गन कशी उचलू शकेल, गोळी कशी मारू शकेल, हा विचार करून मी तिच्या आई ती खूप लहान असल्याचे म्हणालो. पण तिची आई बधली नाही. मी त्यांना बाहेर जायला सांगितले. त्या सातत्याने वर्षभरापासून तिला न थकता, हार न मानता घेऊन येत राहिल्या. शेवटी मला निर्णय बदलावाच लागला. डॉली 1 वर्षापासून ट्रेनिंग घेत आहे. आणि सध्या देशातील सर्वात कमी वयाची नेमबाज आहे. जयपूरमध्ये तिचा निशाणा पाहून सर्व चकित झाले होते. हा खेळ महागडा आहे. डॉलीकडे स्वत:ची पिस्तूलही नाही. इतर नेमबाज तिला प्रॅक्टिससाठी आपली गन वापरू देतात.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...