आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल लॉ इन्स्टिट्यूटमध्ये ज्यूनिअर्सला दिली जाते अश्लील व्हिडिओ पाहाण्याची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट यूनिव्हर्सिटीत (एनएलआययू) सीनिअर्सकडून ज्युनिअर विद्यार्थ्याची रॅगिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित विद्यार्थ्यांनी अँटी रॅगिंग हेल्पलाइनला याबाबत तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे.

ज्यूनिअर विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, सीनिअर रात्री उशीरापर्यंत त्यांना अश्लील व्हिडिओ पाहाण्याची शिक्षा देतात. नंतर जबरदस्तीने दारु पाजतात. सिगारेट ओढून धूर चेहर्‍यावर सोडतात. त्यांना विरोध केल्यास ते जातीवाचक शिवीगाळही करतात.

हॉस्टेलमध्ये मद्यसेवन करतात विद्यार्थी...  
- अँटी रॅगिंग हेल्पलाइनच्या डायरेक्टरकडे आणखी एका पीडित विद्यार्थ्याने तक्रार केली आहे.
- नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट यूनिव्हर्सिटी नरकसमान असल्याचे त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
- हॉस्टेलमध्ये सीनिअर्स मद्यसेवन करतात, हा प्रकार शिक्षक आणि वार्डन्सला माहीत आहे. परंतु ते सर्व त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.  
- एनएलआययूमध्ये रॅगिंग होत असल्याची तक्रार तीन दिवसांत दोनदा आली आहे. पहिली तक्रार 18 तर दुसरी 20 जुलैला आली होती.
- गेल्या वर्षी जुलै महिन्यातच रॅगिंगचा प्रकार समोर आला होता. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ.राजीव खरे यांनी चौकशी सुरु केली होती.

पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोग्राफ्समध्ये पाहा... शनल लॉ इन्स्टिट्यूटमध्ये सीनिअर्स अशी करतात ज्यूनियर्सची रॅगिंग...
बातम्या आणखी आहेत...