आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाइट ड्यूटीवर होती नर्स, एकटीला पाहून त्याची नियत बिघडली; मग घडले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या नर्सवर हॉस्पिटलमधील सहकाऱ्यानेच बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. - Divya Marathi
या नर्सवर हॉस्पिटलमधील सहकाऱ्यानेच बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
ग्वाल्हेर - बिर्ला हॉस्पिटलमध्ये नाइट ड्यूटीवर असलेल्या एका नर्सला तेथीलच एका टेक्निशियनने रेप करण्याच्या उद्देशाने पकडले. नर्सने आरडाओरडा केला आणि त्याला धक्के मारून हॉस्पिटलबाहेर काढले. नंतर ती स्वत: पोलिसांत हजर झाली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवली आहे. दुसरीकडे हॉस्पिटलचा टेक्निशियन फरार झाला आहे.
 
असे आहे प्रकरण...
- येथील बिर्ला रुग्णालयात नुकतीच एक नर्स जॉइन झाली होती. शनिवारी ती ऑपरेशन थिएटरबाहेर नाइट ड्यूटीवर होती. त्यादरम्यान तेथील टेक्निशियन संदीप कौशिक तेथे आला.
- संदीपने नर्सची अगोदर छेड काढली. तिथे चिटपाखरूही नव्हते म्हणून संदीपने तिला बळजबरी ओढत ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. नर्सने आरडाओरडा करून त्याचा विरोध केला, पण तरीही तो तिच्यावर रेप करण्याचा प्रयत्न करू लागला.
 
धक्का मारून पळाली नर्स
- नर्सने संदीपला जोरात ढकलले आणि पळतच हॉस्पिटलच्या बाहेर आली. तिथून तिने सरळ पोलिस स्टेशन गाठले. यादरम्यान टेक्निशियन संदीप कौशिक हॉस्पिटलमधून गायब झाला.
- पोलिस स्टेशनमध्ये नर्सने सांगितले की तिने नुकतीच 1 तारखेला हॉस्पिटलमध्ये नोकरी जॉइन केली होती. पहिल्याच दिवसापासूनच संदीप कौशिक तिला परेशान करत होता. अनेकदा तो शरीराला आक्षेपार्ह स्पर्श करायचा. 
- एक दिवसाआधीच तिची नाइट ड्यूटी लागली होती. यादरम्यान संदीपने तिच्यावर बळजबरी केली. पोलिसांनी नर्सची तक्रार नोंदवून आरोपी संदीपचा शोध सुरू केला आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...