आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी होती साडूच्या घरात, संतापलेल्या पतीने चिमुकलीसमोरच केले असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी भेरूलालने पत्नीवर मुलीसमोरच चाकूने वार केले. - Divya Marathi
आरोपी भेरूलालने पत्नीवर मुलीसमोरच चाकूने वार केले.
इंदूर - जावरा भागात मुलीसमोर पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आपला गुन्हा कबूल करत या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, घरी बोलावूनही पत्नी परत येत नव्हती. मला वाटले की तिची दुसरीकडे भानगड आहे. याचाच राग अनावर होऊन मी हे कृत्य केले.
 
असे आहे प्रकरण...
- सीएसपी दीपक शुक्ला म्हणाले की, खुनाचा आरोपी भेरूलाल माली (45) याला शनिवारी संध्याकाळी रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आहे. त्याच्या जबाबावरून घटनास्थळापासून काही अंतरावरून खुनासाठी वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.
- आरोपी भेरूलाल मालीने 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आपल्या साडूच्या घरी जाऊन स्वत:च्या मुलीसमोर पत्नी शिवाबाईची हत्या केली. तपासात कळले की शिवाबाईचे आरोपी भेरूलालशी 18 वर्षांआधी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.
- भेरूलाल अपंग होता आणि काहीच कामधंदा करत नाही. त्याला दारूचे व्यसनही आहे. दोन वर्षांआधी भेरूलालच्या घराचे छत कोसळले होते. पत्नीने कित्येकदा सांगूनही आळशी भेरूलालने त्याची दुरुस्ती केली नाही. यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या, कामधंदा न करणाऱ्या नवऱ्याला सोडून शिवाबाई माहेरात गेली होती. आणि तिथेच राहू लागली. ती तिथे स्वयंपाकाची कामे करू लागली. नवऱ्याने तिला अनेकदा घरी परत येण्याची गळ घातली, पण ती आली नाही. यावरून नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला.
 
गावात आली, पण मला न भेटल्याने राग आला
- आरोपी म्हणाला की, 18 तारखेला गावात एका कार्यक्रमात पत्नी आली होती. पण कार्यक्रम संपल्यावर ती घरी आली नाही. तर सरळ दुसऱ्या गावी आपल्या छोट्या बहिणीच्या घरी गेली. यामुळे भेरूलाल प्रचंड संतापला आणि तो तडक तिथे पोहोचला.
 
20 रुपयांत घेतला चाकू आणि पत्नीच्या पोटात केले 7 वार
- आरोपीने सांगितले की, त्याने एका दुकानात भाजी कापण्याचा 20 रुपयांचा चाकू घेतला आणि साडूच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीच्या पोटात सपासप वार केले. भेरूलालने 7 पेक्षा अधिक वार केले. यामुळे जागीच शिवाबाईचा मृत्यू झाला. याआधीही त्याने शिवाबाईला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा ती वाचली होती. 
 
आईला तडपताना पाहून किंचाळून पळाली चिमुकली
- खुनाच्या दिवशीच शिवाबाई मुलगी दुर्गाला घेऊन बहिणीच्या घरी गेली होती. शिवाबाई पोहोचली त्या वेळी दुर्गा बहिणीच्या मुलीसह घराबाहेर खेळत होती. तितक्यात भेरूलाल आला आणि त्याने वाद घालायला सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून दुर्गा घरी पोहोचली, तर तिच्यासमोरच भेरूलालने चाकूने शिवाबाईच्या गळ्यावर, हातावर व कमरेवर अनेक वार केले. आईला तडपताना पाहून घाबरलेली दुर्गा रडत रडतच बाहेर पळाली. मग कुठे आजूबाजूच्या लोकांना घटनेबाबत माहिती मिळाली. तोपर्यंत आरोपी पळालेला होता.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या हृदयद्रावक घटनेचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...