आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी नाकात होती नथ, म्हणून नाव पडले नथुराम; गांधींच्या मारेकऱ्याचे Unknown Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेरात हिंदू महासभेने नथुराम गोडसे मंदिर उभारले आहे. - Divya Marathi
ग्वाल्हेरात हिंदू महासभेने नथुराम गोडसे मंदिर उभारले आहे.

भोपाळ - ग्वाल्हेरात हिंदू महासभेने गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचे मंदिर उभारून त्याच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापणा केली आहे. गांधीजींच्या मारेकऱ्याचा असा सन्मान करण्यामागे हिंदू महासभेने नथुराम देशभक्त असल्याचे कारण दिले आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसने आक्षेप घेत या प्रकाराचा विरोधही केला आहे. गाजत असलेल्या या नथुराम मंदिर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर DivyaMarathi.Com वाचकांना नथुरामविषयी अज्ञात बाबी शेअर करत आहे.

 

येथे आहेत नथूराम गोडसेंच्या अस्थी
- पुण्यात ज्या ठिकाणी नथूराम गोडसेच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी रियल इस्टेट, विमा आणि वकिलांची कार्यालयेही आहेत.
- या ठिकाणी काचेत नथूराम गोडसेचे कपडे तसेच त्याने केलेले लिखाणही ठेवण्यात आले आहे.
- पुण्यातील शिवाजीनगरमध्ये नथूरामच्या अस्थी आहेत. ज्या खोलीत नथूरामच्या अस्थी ठेवल्या आहेत त्या ठिकाणी अजिंक्य डेव्हलपर्सचे कार्यालयही आहे.
- या इमारतीचे मालक आणि नथूराम यांचा भाऊ गोपाळ गोडसे यांचा नातू अजिंक्य गोडसेंनी सांगितले की, या अस्थींचे विसर्जन सिंधू नदीतच होईल. अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाल्यावर असे करण्यात येईल. माझ्या आजोबांची हीच अंतिम इच्छा होती. यासाठी कदाचित अनेक पिढयाही जातील. पण एक दिवस अखंड भारत होईल.
- शनिवार पेठेतील एका घरात कधीकाळी नथूराम राहत होता. तो वाडा आता खूपच जुना झाला आहे. त्याठिकाणी प्रिटिंग प्रेसही होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, नथुराम गोडसेच्या लाइफशी निगडित UNKNOWN FACTS

 

(नोट : माहिती विविध रिपोर्ट्सवरून साभार.)
बातम्या आणखी आहेत...