आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचाराच्या बहाण्याने नात्यातील महिलेला घरी बोलावले, तिने स्वत:समोर घडवला रेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - येथे एका महिलेनेच एका बाबाच्या चमत्कारी शक्तीने इलाज करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून आपल्या नात्यातील महिलेवर बलात्कार करवला. शहराच्या शताब्दीपुरममध्ये ही घटना 6 तारखेला सकाळी 4 वाजता घडली. पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपी महिला उषा बघेल आणि बाबा ऊर्फ पप्पू बघेल यांच्याविरुद्ध षडयंत्र आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सोबतच उषाला अटक करण्यात आली आहे.
-मुरारच्या सुरैयापुरातील 35 वर्षीय महिलेने पोलिसांना सांगितले की, माझी तब्येत ठीक नव्हती. 6 तारखेला दुपारी माझी नातेवाईक उषा बघेलचा फोन आला की माझ्या येथे एक पोहोचलेले बाबा आलेले आहेत. त्यांच्या अंगात देव येतो. ते गंभीर आजारसुद्धा क्षणात दूर करतात. उषाचे म्हणणे ऐकून ती रात्री त्यांच्या घरी गेली. तेव्हा तिने म्हणाली की, बाबाच्या अंगात रात्री 2 ते 3 दरम्यान देव येतो, म्हणून तुला थांबावे लागेल. विश्वास ठेवून महिला तिच्या घरी थांबली.
- महिला म्हणाली की, उषाने मला रात्री शुद्धीकरणाच्या बहाण्याने अंघोळ करायला लावली आणि बाबाच्या खोलीत सोडले. त्यानंतर बाबाने माझ्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मी जेव्हा विरोध केला, तेव्हा उषाही खोलीत पोहोचली आणि तिने मला न वाचवता बाबाची साथ दिली. माझ्यावर अत्याचार करून त्यांनी धमकी दिली की, जर मी कुणाला तक्रार दिली, तर मला जिवे मारण्यात येईल. यामुळे भिऊन मी गप्प होते. उषाच्या नवऱ्याची पोस्टिंग सीआरपीएफमध्ये असल्याचे कळते. तो बाहेरगावी ड्यूटीवर असतो. पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरू केला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, पीडितेने पोलिसांना सांगितलेला घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...