आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्ट्रेचरवर लेटून पतीने घेतले पत्नी-मुलीचे अंतिम दर्शन, उपस्थितांचे डोळे पाणावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- इंदूर-पाटणा एक्सप्रेसला झालेल्या दुर्घटनेत प्रसिद्ध आरकेडीएफ कॉलेजचे डेप्युटी चेअरमन सत्येंद्रसिंह यांची पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला. यात सत्येंद्रसिंह यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. सोमवारी त्यांची पत्नी आणि मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्ट्रेचरवरच लेटून सत्येंद्रसिंह यांनी अखेरचा निरोप घेतला. पत्नीच्या डोक्यावर सिंदूर भरला. मुलीच्या मृतदेहाला पुष्पहार अर्पण केला. हे बघून उपस्थितांचे डोळे पाणावले.
असे उध्वस्त झाले सत्येंद्रसिंह यांचे आयुष्य
- सत्येंद्रसिंह, त्यांची पत्नी गीतासिंह (वय 50), मुलगी रागिनीसिंह (वय28) इंदूर-पाटणा ट्रेनने प्रवास करत होते. यावेळी हा भीषण अपघात झाला. त्यात गीतासिंह आणि रागिनीसिंह यांचा मृत्यू झाला. सत्येंद्रसिंह यांना फ्रॅक्चर झाले आहे.
- घटनेची माहिती मिळाल्यानंतर सत्येंद्रसिंह यांचे मित्र, नातलग लगेच गोळा झाले. सत्येंद्रसिंह यांना दोन मुले आहेत. त्यांनी आणि सत्येंद्रसिंह यांच्या भावांनी गीतासिंह आणि रागिनीसिंह यांचे मृतदेह हॉस्पिटलमधून आणले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
- एका नातलगाच्या लग्नासाठी सत्येंद्रसिंह सहकुटुंब ट्रेनने जात होते. पण काही वेळात नातलगांना माहिती मिळाली, की दुर्घटनेत गीतसिंह आणि रागिनीसिंह यांचा मृत्यू झाला.
- 18 नोव्हेंबर रोजी सत्येंद्रसिंह यांचा वाढदिवस होता. यावेळी ते खुप आनंदी होते. मित्रांनी त्यांच्यासाठी खास केक आणला होता. वाढदिवसाच्या दोनच दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांवर काळाने आघात केला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर लोकांच्या स्टोरीज.... आणि इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...