आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळमध्ये मंत्री नड्डांवर शाईफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्सच्या इमारत बांधकामातील दिरंगाई आणि फॅकल्टीसह अन्य सुविधांची पूर्तता न केल्यामुळे नाराज विद्यार्थ्यांनी शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यावर शाईफेक केली. नड्डा येथे एमआरआय व सीटी स्कॅन मशीनच्या उद्घाटनासाठी आले होते.

याआधी चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी मंत्र्यांसमोर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले की, नातेवाइक एम्समध्ये उपचारासाठी यायचे म्हणतात. इथे तर धड इंजेक्शनही मिळत नसल्याने त्यांना काय सांगणार? इथे कोणते प्रॅक्टिकलही होत नाही. यावर नड्डा म्हणाले, आधी जे झाले ते होऊ द्या. आता मात्र सर्व समस्या दूर केल्या जातील. तेव्हा विद्यार्थी म्हणाले, १३ वर्षांत ४ केंद्रीय मंत्र्यांकडून हेच ऐकत आलो आहोत. केव्हा होईल त्याची डेडलाइन एकाही मंत्र्याने दिली नाही.
बातम्या आणखी आहेत...