आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos मधून पाहा मुमताजचा शाही हमाम, या किल्ल्यात आजही भटकते तिची आत्मा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाही महालातील मुमताजचा हमाम. - Divya Marathi
शाही महालातील मुमताजचा हमाम.
इंदूर - शहाजहां आणि मुमताज बेगमच्या प्रेमाला बुऱ्हाणपुरातील फारुखी काळातील शाही किल्ल्यात साज चढला. या किल्ल्याच्या दारे-खिडक्याच नाही तर वेगवेगळ्या दालनांपासून ते हमाम (अंघोळीची जागा) पर्यंत आजही शहाजहां आणि मुमताजच्या सुंदर प्रेमाचे साक्षीदार आहेत. असे म्हणतात की, मुमताजची आत्मा आजही या महालात भटकते. तथापि, 17 जून रोजी मुमताजचा 14व्या अपत्याला जन्म देताना मृत्यू झाला होता.
- शहाजहां या किल्ल्यात जवळपास 5 वर्षे राहिले. हा किल्ला शहाजहां यांना इतका आवडला की आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या 3 वर्षांतच त्यांनी किल्ल्याच्या छतावर दिवाने आम आणि दिवाने खास नावाने दोन दरबार बनवले. शहाजहांने या किल्ल्यात सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अशी एक जागा बनवली जिथे ते त्यांची बेगम मुमताज सोबत एकांतात राहू शकतील.
- मुमताज यांचा मृत्यूही बुऱ्हाणपुरात झाला. परंतु शहाजहांने आपल्या प्रिय बेगमसाठी ताजमहाल उभारून तिला तिथे दफन केले. परंतु खूप कमी लोकांना हे माहितीये की, ताजमहाल बांधेपर्यंत मुमताजचे पार्थिव बुऱ्हाणपूरमध्येच दफन करण्यात आले होते. अनेक लोकांचा दावा आहे की, आजही या किल्ल्याजवळून रात्रीच्या वेळी एका महिलेच्या कण्हण्याचा आवाज येतो. काहींचा दावा आहे की हा मुमताजचाच आवाज आहे.
 
शहाजहानी हमाम...
-शहाजहांने बेगम मुमताजसाठी शाही किल्ल्यात एका विशेष हमामाचे बांधकाम केले होते. याच्या भिंतींपासून ते छतापर्यंत उत्कृष्ट नक्षीकाम करण्यात आले होते. त्यावर जयपूरच्या आमेर महालाप्रमाणे रंगीत काचांचे तुकडे लागलेले होते. अंधारात फक्त एक दिवा लावूनच पूर्ण हमाम प्रकाशमान होत होते. हमामची फरशी संगमरवराची आहे. मध्ये एक हौद आहे. हौदात कारंजेही आहे.
- असे म्हणतात की रोज सकाळी दासी मोसमानुसार हमाममध्ये थंड वा गरम पाणी भरत होत्या. या पाण्यात दूध, मध, चंदन, केसर, अत्तर आणि ताज्या गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या जायच्या. या हमामात अनेक सुंदर चित्रेही लावली होती. या चित्रांपैकीच एक पाहून नंतर शहाजहांने ताजमहाल बांधले, अशी आख्यायिका आहे.
 
आजही भटकते मुमताजची आत्मा?
- असे म्हणतात की, 400 वर्षाँपूर्वी मुमताज बेगमचा मृत्यू बुलारा महालात झाला तेव्हा शहाजहां बुऱ्हाणपुरातच ताजमहालाची निर्मिती करणार होते. परंतु काही कारणास्तव हे शक्य नाही होऊ शकले. आणि आगऱ्यात ताजमहाल बांधल्यावर तेथे मुमताजचे पार्थिव नेऊन दफन करण्यात आले. येथील रहिवासी मानतात की, मुमताजचा देह येथून नेण्यात आला असला तरी आत्मा आजही या महालात आहे. या किल्ल्यात आजही मुमताजची आत्मा भटकत असते, काही जण असा दावाही करतात. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, हमामाचे फोटोज आणि शाही किल्ल्याची सुंदर दृश्ये...
बातम्या आणखी आहेत...