आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Internal Clashes On Rise In Madhya Pradesh Congress

पराजयानंतर कॉंग्रेसमध्‍ये असंतोष वाढला, दिग्विजयसिंहांवर टाकला बहिष्‍कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- चार राज्‍यांमध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीनंतर निवडणुकीत झालेल्‍या पराभवानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत भांडणे चव्‍हाट्यावर येत आहेत. मणिशंकर अय्यर यांच्‍यासारख्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी थेट पंतप्रधानपदी मनमोहनसिंग यांच्‍या निवडीवर प्रश्‍नचिन्‍ह ठेवल्‍यानंतर आता मध्‍य प्रदेशमध्‍ये कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्‍यावर बहिष्‍काराचा पावित्रा काही पराभूत उमेदवारांनी घेतला आहे.

खासदार सत्‍यव्रत चतुर्वेदी यांच्‍यानंतर महिदपूर येथून पराभूत झालेल्‍या कल्‍पना परुळेकर यांनी मध्‍य प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री दिग्विजय सिंह यांच्‍याविरोधात उघडपणे नाराजी व्‍यक्त केली आहे. परुळेकर यांनी सांगितले, की दिग्विजय यांच्‍यावर बहिष्‍कार टाकला पाहिजे. तसेच उज्‍जैनचे खासदार प्रेमचंद गुड्डू यांची पक्षातून हकालपट्टी करायला हवी. त्‍यानंतरच कॉंग्रेसमध्‍ये बदल होईल. गुड्डू यांनी माझ्या पराजयासाठी 12 कोटी रुपये खर्च केले. माझ्या विरोधात उभे असलेले दिनेश जैन बोस हे गुड्डू यांचे समर्थक आहेत. गुड्डू यांनी माध्‍यमांमध्‍ये मला कायम कमकुवत उमेदवार म्‍हणून सादर केले. संपूर्ण पक्षानेच माझ्याविरुद्ध काम केले. याबाबतीत पक्षाध्‍यक्ष सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्‍यासह संबंधितांना पत्र लिहिले आहे, असे परुळेकर यांनी सांगितले.

परुळेकर यांनी केलेल्‍या आरोपानंतर दिग्विजय सिंह यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही. परंतु, खासदार गुड्डू यांनी सांगितले, की अशा मुद्यांवर पक्षाच्‍याच व्‍यासपीठावर चर्चा करायला हवी.