आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीआधी पिते तूप, खाते बदाम; \'दंगल गर्ल\'ने दिल्या या TIPS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - ज्या पद्धतीने आम्ही लहानपणी मेहनत घेतली, तशी मेहनत सध्याच्या मुली क्वचितच घेताना आढळतात. आम्ही आजही तितक्याच कठोरपणे तयारी करतो. खरे सांगायचे तर आता पहिल्यापेक्षा जास्त कडक तयारी करावी लागते. कारण लोक आम्हाला आदर्श मानतात. आमचे उदाहरण देतात. म्हणूनच मेहनतीसोबत आम्हाला खाण्यापिण्यावरही विशेष लक्ष द्यावे लागते. मी सकाळी प्रॅक्टिसनंतर 250 ग्रॅम बदाम खाते. तसेच कुस्ती लढण्याआधी तूप पिते. या सर्व बाबी कुस्तीपटू बबिता फोगाटने सांगितल्या. ती एका कार्यक्रमात सहभागी व्हायला इंदुरात आली होती.
 
आणखी काय म्हणाली बबिता....
- बबिता म्हणाली की, आम्हाला लोकांचे प्रेम आणि सन्मान खूप मिळतो, परंतु कुठे न कुठे आमचे खासगी आयुष्य संपले आहे. आम्ही आमच्या मर्जीने काहीच बोलत नाहीत. काही चुकीचे बोलले तर त्याचा सरळ आमच्या करिअरवर परिणाम होतो. म्हणूनच म्हणते की, शिखरावर पोहोचणे एकवेळ सोपे आहे, पण त्यावर टिकून राहणे ही त्याहून मोठे आव्हान आहे.
 
हरण्यासाठी कोणीच मेहनत घेत नाही...
- आम्हा खेळाडूंच्या मनाला नेहमी एक गोष्ट खटकते, जिंकणाऱ्याला सिकंदराप्रमाणे सन्मान दिला जातो, पण हरणाऱ्याला मानही दिला जात नाही. माझ्या मते, दोघांचाही सन्मान झाला पाहिजे. कारण हरण्यासाठी कोणीच मेहनत घेत नाही. म्हणूनच मला सरकार आणि लोकांना सांगावेसे वाटते की, जिंकणाऱ्याप्रमाणेच हरणाऱ्याचाही सन्मान करा, यामुळे तो मोटिव्हेट होईल.
 
नशा करायचाच असेल खेळाचा करा
- पालकांना जर आपल्या मुलांच्या ऊर्जेला एखाद्या सकारात्मक कामात लावायचे असेल, तर खेळ हा एक चांगला पर्याय आहे. कारण जे लोक नशा करतात, त्यांना म्हणेन की नशा खेळाचा करा. या नशेत फायदाच फायदा आहे. तब्येतीबरोबरच भविष्यही उज्ज्वल होते. म्हणूनच पालकांनी जबाबदारीने मुलांना लहानपणीच खेळात सहभागी करावे. खेळाला संस्कृती आणि संस्काराप्रमाणेच जीवनात महत्त्व दिले पाहिजे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...