आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS बनायचे होते या डान्सरला, एका डान्स परफॉर्मन्सने बदलली लाइफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - प्रसिद्ध डान्सर शक्ती मोहनने म्हटले की, डान्स आणि अॅथलेटिक्समध्ये जास्त फरक नाहीये. डान्सर बनवण्याआधी 8 वर्षे शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. शक्ती मोहन गुरुवारी इंदूर शहरात आली होती. येथे त्यांनी divyamarathi.com शी खास बातचीत केली...
 
स्वत:बद्दल हे म्हणाली शक्ती
- फेमस डान्सर शक्ती मोहन म्हणाली की, डान्स आणि अॅथलेटिक्समध्ये जास्त फरक नाहीये. दोन्हीही  परफॉर्मिंग आर्ट्स आहेत. फिटनेस, अनुशासन, अॅक्युरसी आणि स्वत:चेच जुने रेकॉर्ड मोडून नवे सेट करण्याचे ध्येय असते.
- डान्सर्ससाठी हेल्दी आणि फिट राहणे आवश्यक आहे. केव्हा लिफ्ट करायचे, केव्हा जम्प पुश करायचे, अशी प्रत्येक बाब गरजेची असते. किंबहुना, एका अॅथलिटपेक्षाही जास्त मेहनत घेतो आम्ही डान्सर्स.
- हो, असे नक्कीच होते की बहुतांश मुले डान्स फील्डला फॅन्सी वर्ल्ड समजून जॉइन करतात आणि मग अपेक्षाभंग होऊन दूर जातात. डान्स म्हणजे फॅन्सी वर्ल्ड नाही, येथे त्याग आणि समर्पण आवश्यक आहे.
 
IAS व्हायचे होते, पण एका डान्सने बदलली लाइफ
-शक्ती मोहन म्हणाली की, तिला आयएएस होण्याची इच्छा होती. ती कॉलेजमध्ये टॉपर होती. मात्र, आयुष्यात असा काही टर्निंग पॉइंट आला आणि लाइफच बदलून गेली.
- शक्तीने सांगितले, की मी आयएएसची तयारी करत होते. राज्यशास्त्रामध्ये माझे एमए झाले आहे. कॉलेजची टॉपर म्हणून मी ओळखली जात होते. 
- मला प्रशासकीय सेवेची पहिल्यापासून आवड होती. मात्र मुंबईत आल्यानंतर टॅरेन्स लुईसचे डान्स क्लास जॉईन केले आणि तेव्हाच 'डीआयडी'चे ऑडिशन सुरु झाले होते. 
- त्यासाठी मी लुईस सरांचे मार्गदर्शन घेतले. ते म्हणाले ही स्पर्धा फार टफ आहे पण तू प्रयत्न केले पाहिजे. 
- 'डीआयडी'मध्ये माझी निवड झाली आणि ती स्पर्धाही मी जिंकले आणि सगळेच बदलले. तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. 
- त्यानंतर मी या इंडस्ट्रीमध्ये माझा प्रवास सुरु झाला, तो अजूनपर्यंत सुरु आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शक्तीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...