आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ राज्यांत १४५ लाख कोटी रुपयांचे करार, पण गुंतवणूक आणि नोकरीचे प्रमाण घटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राज्यांतील सरकार शिखर संमेलने आयोजित करत आहेत. आतापर्यंतच्या संमेलनातील आकडे पाहिले असता आश्वासने आणि वास्तव स्थितीत मोठे अंतर दिसते.

गुजरातेत २००३ मध्ये संमेलनाला सुरुवात झाली. यानंतर १२ राज्यांमध्ये झालेल्या संमेलनात गुंतवणूकदारांनी १४५ कोटींची आश्वासने दिली, पण गुंतवणूक मात्र १० टक्क्यांपेक्षा कमी केली. मध्य प्रदेश सरकार १३ टक्के गुंतवणुकीचा दावा करत आहे. वास्तविक पाहता सुरुवातीच्या संमेलनात रोजगाराचे आकडे दिले जात नाहीत. तरीसुद्धा जे आकडे उपलब्ध आहेत त्यावर नजर टाकल्यास आश्वासनांच्या तुलनेत केवळ १० टक्के नोकऱ्या मिळाल्या आहेत.

अनेक राज्यांत जमीन मिळत नसल्याने अडचण वाढली. जमीन मिळाली तरी मंजुऱ्या मिळण्यासाठी वेळ लागतो. उदा. मध्य प्रदेशात करारापासून उत्पादन सुरू करेपर्यंत ७० मंजुऱ्या लागतात. यासाठी ३ वर्षे लागतात. विमानतळ आणि महामार्गाशी जोडलेली जमीन गुंतवणूकदारांना लागते. दरवेळी अशी जमीन मिळणे अवघड असते.

जागतिक बँकेच्या जूनच्या अहवालात म्हटले आहे की, २०१५ मध्ये भारतात खासगी गुंतवणूक १० वर्षांत सर्वात कमी आहे. एचएसबीसीच्या अहवालानुसार, २०१५-१६ मध्ये सार्वजनिक

गुंतवणूक दोन दशकांत
सर्वाधिक म्हणजे २१ टक्के वाढली, पण खासगी गुंतवणूक एका वर्षाच्या तुलनेत १.४ टक्के घटली. एकूण गुंतवणुकीत खासगी क्षेत्राचा हिस्सा ७५ टक्के आहे. त्यामुळे गुंतवणूक वाढीचा दर
केवळ ४ टक्के आहे.

१४% नव्या गुंतवणुकीत घट २०१५-१६ मध्ये ८६.५ प्रकल्प ज्यांची मागील वर्षी घोषणा झाली,
काम नाही

८७ प्रकल्प घोषणेच्या पाच वर्षे मागे चालत आहेत
५७ प्रकल्पांचा दर ३५ %नी वाढला. उशिराने सुरू झाल्यामुळे

झारखंड
आतापर्यंत एकही प्रकल्प पूर्ण नाही
२३-२४ एप्रिल २०१५ रोजी अॅडव्हांटेज झारखंड नावाने अन्न प्रक्रिया उद्योगातील गुंतवणूकदारांसाठी एक संमेलन घेण्यात आले. एकूण सात करार करण्यात आले. यात ७८० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि चार हजार लोकांना रोजगार मिळेल असा दावा केला. प्रकल्प पूर्ण नाही.

छत्तीसगड
५ प्रकल्प सुरू
नोव्हेंबर २०१२ मध्ये आयोजित संमेलनात २५७ करार झाले. यात १.२५ लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. ६ लाख लोकांना नोकरी मिळणार होती. फक्त ५ प्रकल्पात उत्पादन सुरू आणि ३ चे काम सुरू. गुंतवणूक आणि रोजगाराचे आकडे मात्र अद्याप उपलब्ध झाले नाहीत.

गुजरात
७ संमेलने, पैसा ५% आला
२००३-१५ पर्यंत ७ संमेलनांत १०४.५५ लाख कोटींच्या ५१,४३४ प्रकल्पांसाठी करार झाले.
२४,३१२ प्रकल्प सुरू झाले आहेत
७,३६५
प्रकल्पांवर
काम सुरू
सरकारने गुंतवणुकीचे आकडे सांगितले नाहीत. पण सूत्रांनुसार ते ३-५% दरम्यान आहेत.
नोकऱ्यांचे आश्वासन
१०७.७०लाख नोकऱ्या देणार
१३.३० लाख जॉब मिळाले.
म्हणजे १२%
मध्य प्रदेश ८ संमेलने, १३% गुंतवणूक
२००७-१४ पर्यंत राज्यात आठ संमेलने. २०.४३ लाख कोटी गुंतवणुकीसाठी ३,३९० सामंजस्य करार
२.७८ लाख कोटींच्या गुंतवणुकीवर काम सुरू. २ लाख लोकांना रोजगाराचा दावा
सूत्रांच्या मते, यात संमेलनाबाहेरील गुंतवणूकही सामील. काँग्रेसचा ४%चा दावा
२२-२३ ऑक्टोबरच्या संमेलनात ५.६२ कोटींचे २,६३० करार झाले

राजस्थान
९ टक्केही गुंतवणूक नाही
२००७ मध्ये १.६२ लाख कोटींचे,
२०१५ मध्ये ३.२१ लाख कोटींचे ५९५ करार
४३,००० कोटींची गुंतवणूक झाली. म्हणजे २४%
२०१५ संमेलनाची स्थिती
३.२१ लाख कोटींच्या करारातून फक्त ४ हजार कोटींची गुंतवणूक
२९५ करार झाले. त्यात २६ पूर्ण झाले. म्हणजे ८.८%
२.४ लाख लोकांना रोजगार द्यायचा होता. मिळाला २० हजार लोकांना

हरियाणा
५ लाख लोकांना रोजगाराचा दावा
मार्च २०१६ मध्ये ‘हॅपनिंग हरियाणा’चे आयोजन केले. यात
६.४० लाख कोटींचे ४०७ करार झाले. ५ लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. १२२ कंपन्यांनी जमीनही घेतली. ७० हजार कोटींच्या प्रकल्पांवर काम सुरू. १.२ लाख रोजगाराची आशा

बिहार
गुंतवणूक शून्य
२००६ आणि २०१० मध्ये संमेलने घेण्यात आली. मुकेश अंबानी, रतन टाटा, सुनील मित्तल, वाय.सी. देवेश्वर आणि अानंद महिंद्रा असे बडे उद्योजक आले होते, पण पैसा मात्र कोणीही लावला नाही. पवन मुंजाल यांनी सायकलची कंपनी उभी केली आहे. पण हा संमेलनातून बाहेरचा प्रस्ताव ठरला होता.

आंध्र प्रदेश
जानेवारी २०१६ मध्ये ‘पार्टनरशिप समिट’ झाली
४.७८ लाख कोटींच्या ३३१ करारांवर स्वाक्षऱ्या
१० लाख लोकांना रोजगाराचे आश्वासन

कर्नाटक
फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘इन्व्हेस्ट कर्नाटक’चे आयोजन
३.०८ लाख कोटींचे १,२०१ करार झाले
६.७० लाख जणांना रोजगाराचे आश्वासन

पश्चिम बंगाल
जानेवारी २०१६ आणि २०१५ मध्ये संमेलनांचे आयोजन
२.५० लाख कोटी आणि २.४३ लाख कोटींचे करार
९५,००० कोटींच्या करारावर काम सुरू

पंजाब
डिसेंबर २०१३ आणि ऑक्टो. २०१५ मध्ये दोन संमेलने झाली
१.८ लाख कोटींचे ५०६ करार झाले
५६ करार वास्तवात उतरल्याचा दावा

तामिळनाडू
सप्टेंबर २०१५ गुंतवणूकदारांनी २.४२ लाख कोटींचे ९८ करार केले

मेक इन इंडिया वीकमध्ये १५ लाख कोटींचे करार
‘मेक इन इंडिया वीक’मध्ये १७ राज्यांनी सहभाग घेतला. १५.२ लाख कोटींचे गुंतवणूक करार झाले. सप्टेंबरमध्ये आयोजित संम्मेलनात १५ हजार कोटींच्या करारावर हस्ताक्षर झाले.
बातम्या आणखी आहेत...