आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Its Not Apropriate To Call Wife Black, Court Statement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीला काळी संबोधणे क्रौर्यच, न्यायालयाचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - पत्नीला काळी संबोधणेदेखील क्रौर्यापेक्षा कमी नाही, असे घरगुती हिंसाचाराच्या एका प्रकरणात येथील न्यायालयाने म्हटले आहे. काळी संबोधणे व हुंडा मागण्याच्या प्रकरणात उपजीविकेसाठी पत्नीला दरमहा 5 हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. एका कंपनीत सेल्स मॅनेजर सुरेश कुमावतशी 2003 मध्ये अंजलीचे लग्न झाले होते. अपत्यासाठी दबाव टाकणार नाही व एमबीए करू देऊ, असा शब्द सासरच्यांनी तिला लग्नाच्या वेळी दिला. पण लाखो रुपये हुंडा घेऊनही तिचा छळ होत होता. तिने न्या. आर.के. रावतकर यांच्या कोर्टात तक्रार दिली होती.