जबलपूर- मध्यप्रदेशातील जबलपूर येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. डी.के.शाकल्ये यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी पावने आठच्या सुमारास ही घटना घडली. पत्नी सकाळी घराबाहेर फरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर डॉ. शाकल्ये यांनी होती. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पावने आठ वाजेच्या सुमारास डॉ. शाकल्ये यांनी अंगावर रॉकेल ओतून जाळून आत्महत्या केली. डॉ.शाकल्ये कॉलेज परिसरातील बंगल्यात राहत होते. त्यांचा मुलगा बंगळुरु येथे राहतो. विशेष म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते.
ओरडण्याचा आवाज ऐकून कमर्चारी आणि त्यांची पती घराच्या मागे धावत गेले. परंतु तोपर्यंत डॉ. शाकल्ये हे 90 टक्के भाजले गेले होते. डॉ.शाकल्ये यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याआधीत डॉ. शाकल्ये यांची प्राणज्योत मालवली होती. घटना स्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोट आढळून आली आहे.