आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानमध्ये पुराचे थैमान, कुशलगडच्या SDM ची जीप गेली वाहून, ड्रायव्हरला वाचवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांसवाडा (राजस्थान)/भोपाळ - जोरदार पावसामुळे राजस्थानमधील नदी-नाले ओसंडून वाहात आहेत. शुक्रवारी बांसवाडा जिल्ह्यातील बिलडी नदीच्या प्रवाहात कुशलगडचे एसडीएमचे वाहन वाहून गेले. अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. मध्यप्रदेशातही मान्सून सक्रिय झाला आहे. इंदूर-भोपाळसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरादर सरी बरसत आहेत. 
 
ड्रायव्हरला वाचवण्यात यश 
- कुशलगढचे एसडीएम रामेश्वर दयाल मीणा यांची गाडी वाहून जाण्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. जीपमध्ये एसडीएम मीणा यांच्यासह तीन जण होते. ड्रायव्हर आणि आणखी एका व्यक्तीला वाचवण्यात आले आहे. मात्र मीणा यांच्या शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. एसडीएम मीणा यांचा शोध सुरु आहे. 
 
अशी झाली दुर्घटना 
- पोलिस अधीक्षक कालूराम रावत म्हणाले, एसडीएम मीणा कुशलगडला परतत होते. रस्त्यात एका पुलावर पाच ते सात फुट पाणी होते. एवढे पाणी असताना ड्रायव्हरने  जीप टाकली. वेगवान प्रवाह असल्यामुळे जीप हेलकावे घेत नदीच्या प्रवाहात गेली. 
- पुलापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर ड्रायव्हर एका झाडाला अडकलेला होता. एसडीएम मीणा यांचा मात्र थांगपत्ता लागला नाही. 
- जीपमध्ये एसडीएम मीणा यांच्यासह तीन जण होते त्यांतील दोघांना वाचवण्यात आले आहे. 
 
हेही वाचा.. 
बातम्या आणखी आहेत...