भोपाळ (मध्य प्रदेश)- जेट एअरवेजचे विमान खजुराहो विमानतळावर लॅंड होत असताना अचानक रनवेवर धडकले. त्यानंतर विमानाचे समोरचे चाक निखळले. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत आलेली नाही. पण अपघाताने घाबरलेल्या प्रवाशांनी विमानातून उड्या मारत प्राण वाचवले. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या आणि सेक्युरिटी गाड्या विमानाजवळ दाखल झाल्या. प्रसंगावधान राखून वैमानिकाने विमान योग्य पद्धतीने उतरविले असे सांगितले जात आहे. दिल्ली येथून खजुराहो येथे जात असलेल्या या विमानात 4 क्रू मेंम्बर्ससह 56 प्रवासी होते.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले, की जेट एअरवेजचे विमान दिल्ली येथून बनारस मार्गे खजुराहोला जात होते. यात देश-विदेशातील 56 प्रवासी आणि 4 क्रू मेंम्बर्स होते. खजुराहो विमानतळावर उतरताना विमानाचा हायड्रोलिक गेअर अडकला. त्यामुळे विमानाचे डावे पंख तुटले. चाकांजवळ ते अडकून पडले. चाक न निघाल्याने विमान एका बाजूला झुकले. यावेळी जोरदार आवाज आला. विमानातील प्रवासी प्रचंड घाबरले. प्रवाशांनी विमानातून उड्या मारत जीव वाचवला.
विमानातील प्रवासी विरेंद्र चौहान यांनी सांगितले, की लॅंड झाल्यानंतर विमानाने दोन तीन वेळा उसळले. त्यानंतर एका बाजूला झुकले. दुपारी सुमारे दिडच्या सुमारास हा अपघात झाला. विमान थांबल्यानंतर वैमानिकाने चारही इमरजन्सी डोअर उघडले. प्रवासी विमानाबाहेर पडले. या अपघातामुळे इंडियन एअरलाईन्सच्या येथील विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. उद्या आणि परवा या विमानतळावरुन विमानाचे उड्डाण केले जाणार नाही, असे सांगितले जात आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या अपघाताचे Exclusive फोटो....
(फोटो: राजेश चौरसिया)