आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Journalist Covering Recruitment Scam Died In Madhya Pradesh

व्यापमं घोटाळा : वार्तांकनासाठी गेलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचाही मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाबुआ - व्यापमं घोटाळ्याशी संबंधीतांच्या मृत्यूचे प्रकरण वार्तांकन करण्यासाठी दिल्लीहून गेलेले वृत्तवाहिनी पत्रकार अक्षय सिंह यांचा शनिवारी मध्यप्रदेशच्या मेघनगरात मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी ते टीचर्स काॅलनीतील एमबीबीएसची विद्यार्थी नम्रता डामोरच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नातेवाईकांशी चर्चा करत होते. नम्रताच्या नातेवाईकांशी चर्चा करत असताना अक्षय सिंह(३५) यांची अचानक तब्येत बिघडली आणि ते जमीनीवर कोसळले. त्यांचे सहकारी राहुल करय्या यांनी त्यांना सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. करय्या यांना त्यावर विश्वास न बसल्याने ते ज्योती रुग्णालयात गेले. तेथेही समाधान न झाल्याने दाहोदच्या (गुजरात) रुग्णालयात घेऊन गेले. त्यांनीही त्यांना मृतच घोषित केले.
दिल्लीत पोस्टमाॅर्टेम करण्याची मागणी
काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच आपली अक्षय सिंह यांच्याशी दिल्लीत भेट झाली होती. व्यापमं घोटाळ्याचे वार्तांकन करताना काहीही घडू शकते. त्यामुळे सतर्क राहा, असा सल्ला मी त्यांना दिला होता, असे दिग्विजिय सिंग यांनी म्हटले आहे. दिल्लीत व्हिडिओ चित्रिकरणात वरिष्ठ डॉक्टरांकडून अक्षय सिंह यांचे शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.